मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायजर्संच्या सामन्यात शेन वॉटसन, अंबाती रायुडू यांच्या उल्लेखनीय खेळीनंतर CSK सहज बाजी मारेल असेच वाटले होते. पण, कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders)ने जोरदार कमबॅक केले. त्यांच्या गोलंदाजांनी CSKच्या धावगतीवर लगामच लावला नाही, तर विकेट्सही काढल्या. KKRनं १० धावांनी हा सामना जिंकून गुणतक्त्यात तिसरे स्थान पटकावले. चेन्नईला विजयासाठी 21 चेंडूत 38 धावांची गरज असताना केदार जाधवच्या संथ खेळीमुळे चेन्नईचा विजय दूर गेला अन् पराभवाचा व्हिलन केदार जाधव ठरला. त्यामुळे, केदार जाधवला नेटीझन्कडून ट्रोल करण्यात येत आहे.
विजयासाठी २१ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना केदार जाधव खेळपट्टीवर आला. पण, त्याला फटके मारताच आले नाही. त्यामुळे, नेटीझन्सच्यामते चेन्नईच्या पराभवाचा व्हिलन केदार जाधव ठरला. म्हणून चेन्नईच्या चाहत्यांनी पराभवानंतर केदार जाधवला ट्रोल करण्यास सुरूवात केली.
KKRचा कर्णधार दिनेश कार्तिकनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात सुनीन नरीनच्या जागी राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल यांनी KKRच्या डावाची सुरुवात केली. पण, त्रिपाठी वगळता KKRचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. शुबमन गिल ( ११), इयॉन मॉर्गन (७), नितिश राणा ( ९), सुनील नरीन ( १७), आंद्रे रसेल ( २) आणि कार्तिक ( १२) यांना CSKच्या गोलंदाजांनी मोठी खेळी करूच दिली नाही. एकट्या राहुल त्रिपाठीनं KKRची खिंड लढवली. त्यानं ५१ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८१ धावा चोपल्या. CSKकडून शार्दूल ठाकूर, सॅम कुरन, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी २, तर ड्वेन ब्राव्होनं तीन विकेट्स घेतल्या. KKRला २० षटकांत सर्वबाद १६७ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात CSKची सुरुवातही फार चांगली झाली नाही. फॅफ ड्यू प्लेसिस ( १७) चौथ्या षटकात शिवम मावीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध फॉर्मात परतलेल्या शेन वॉटसननं ( Shane Watson) KKRच्या गोलंदाजांचाही समाचार घेतला. त्यात अंबाती रायुडूनं दुसऱ्या विकेटसाठी उत्तम साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कमलेश नागरकोटीनं १३व्या षटकात रायुडूला ( ३०) बाद केले. सुनील नरीननं CSKला मोठा धक्का दिला. ४० चेंडूंत १ षटकार व ६ चौकार मारून ५० धावा करणाऱ्या वॉटसनला त्यानं माघारी पाठवलं. वॉटसननंतर सर्व जबाबदारी धोनीवर होती, पण वरूण चक्रवर्थीनं त्याला ( ११) धावांवर त्रिफळाचीत केले. सॅम कुरनही ( १७) धावांवर बाद झाल्यानं CSKच्या हातचा सामना निसटताना दिसला. केदार जाधवने शेटवच्या षटाकांतही अतिशय संथ खेळी करत अनेक चेंडू डिफेन्स केले. त्यामुळे धावा व चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेले आणि CSKला ५ बाद १५७ धावांवर समाधान मानावे लागले. KKRने १० धावांनी हा सामना जिंकला.
Web Title: CKS vs KKR : Kedar Jadhav's 'defense' shot was well washed by the netizens after loss match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.