- हर्षा भोगले लिहितात...अंतिम फेरीत इंग्लंड संघ दावेदार आहे आणि त्यांनी जगातील अव्वल संघाच्या थाटात अंतिम फेरी गाठली आहे. दरम्यान, मधल्या काळात त्यांची वाटचाल अडखळली होती. त्यांच्या प्रवासात ते मार्ग भरकटले होते जसे विम्बल्डनमध्ये चॅम्पियन रॉजर फेडररला एक सेट गमवावा लागला होता. इंग्लंड संघ लॉर्ड््समध्ये जेतेपद पटकाविण्याच्या निर्धारानेच उतरेल.न्यूझीलंड संघाची प्रशंसा केली जाते; पण विजेतेपदासाठी त्यांना तेवढी संधी दिसत नाही. विश्वकप मोहिमेत त्यांचा संघ मधल्या काळात वाट चुकला होता. त्यांच्या नजरेत नक्कीच विजेतेपद आहे; पण इंग्लंडला पराभूत करण्यासाठी त्यांना कडवे आव्हान उभे करावे लागेल. श्रीलंकेविरुद्ध इंग्लंड संघ दावेदार होता आणि भारताविरुद्ध न्यूझीलंड संघ छुपा रुस्तम हे विसरता येणार नाही. आपल्याला सर्वांना माहीत आहे की, या लढतींचा निकाल काय लागला. एक निराशाजनक अर्ध्यातासामुळे काय घडू शकते, याची तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच.न्यूझीलंडला या लढतीत विजय मिळवायचा असेल तर त्यांना चेंडू स्विंग करावा लागेल आणि फलंदाजांना धावफलकावर धावा लावाव्या लागतील. पण, जर यंदाच्या विश्वकप स्पर्धेत अनेक लढतींमध्ये जसे बघायला मिळाले तसा जर चेंडू सरळ राहिला तर इंग्लंडला अधिक अडचण भासणार नाही. इंग्लंडसाठी ख्रिस व्होक्सचा स्विंग मारा आणि जोफ्रा आर्चरची वेगवान गोलंदाजी मुख्य अस्त्र असतील. सूर्यप्रकाश, पाटा खेळपट्टी, छोटी सीमारेषा याचा अर्थ ही लढत इंग्लंडची राहील. ढगाळ वातावरण, आर्द्रता याचा अर्थ न्यूझीलंड कडवे आव्हान देईल. काहीही असले तरी नवा विश्वविजेता मिळणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- स्वच्छ सूर्यप्रकाश, पाटा खेळपट्टीवर इंग्लंडचा दावा मजबूत
स्वच्छ सूर्यप्रकाश, पाटा खेळपट्टीवर इंग्लंडचा दावा मजबूत
अंतिम फेरीत इंग्लंड संघ दावेदार आहे आणि त्यांनी जगातील अव्वल संघाच्या थाटात अंतिम फेरी गाठली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:12 AM