Join us  

बीसीसीआय पदाधिका-यांना नोटीस

सीईओ राहुल जोहरी यांना एसजीएममध्ये सहभागी होण्यास मान्यता न दिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्यासह अन्य पदाधिकाºयांना प्रशासक समितीने (सीओए) नोटीस पाठवली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 2:32 AM

Open in App

नवी दिल्ली : सीईओ राहुल जोहरी यांना एसजीएममध्ये सहभागी होण्यास मान्यता न दिल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांच्यासह अन्य पदाधिकाºयांना प्रशासक समितीने (सीओए) नोटीस पाठवली आहे. यामध्ये कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनाही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.सहा एप्रिलला देण्यात आलेल्या सीओएच्या तिसºया स्थिती अहवालामध्ये जोहरी यांना बीसीसीआयच्या प्रत्येक बैठकीमध्ये सीओएचे प्रतिनिधी म्हणून निश्चित केले होते. परंतु, बुधवारी झालेल्या सर्वसाधारण विशेष बैठकीत जोहरी यांना सहभागी होण्यास नकार देण्यात आला होता. कार्यवाहक सचिव अमिताभ यांनी जोहरी यांना बैठकीतून बाहेर जाण्यास सांगितले होते.याबाबत अमिताभ यांनी युक्तिवाद केला की, सर्वोच्च न्यायालयाने २४ जुलैला दिलेल्या निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटले की, एसजीएममध्ये केवळ राज्य संघटनांचे पदाधिकारीच सहभागी होऊ शकतील आणि ते या आदेशाचे पालन करत होते.बीसीसीआयच्या एका अधिकाºयाने सांगितले की, ‘सीओएने खन्ना, अमिताभ चौधरी आणि अनिरुध्द चौधरी यांना ई-मेल पाठवले आहेत. राहुल जोहरी यांना बैठकीतून बाहेर जाण्यास का सांगितले याचे कारण सीओएला जाणून घ्यायचे आहेत. बीसीसीआयशी जोडले गेल्यानंतर जोहरी यांनी प्रत्येक बैठकीमध्ये सहभाग घेतला आहे.’ दरम्यान, या बैठकीमध्ये जोहरी यांच्यासह महाव्यवस्थापक एम. व्ही. श्रीधर यांनाही बैठकीमध्येसहभागी होण्यास मान्यता देण्यात आली नाही. (वृत्तसंस्था)