लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : सामना सुरु असताना प्रशिक्षक तो जवळून पाहत असतात. त्याचबरोबर खेळाडूंना काही सूचना आणि मार्गदर्शन करत असतात, पण प्रशिक्षक चक्क मैदानात उतरून खेळत असल्याचे तुम्ही पाहिले नसेल. पण विश्वचषकाच्या सराव सामन्यात चक्क इंग्लंडचे प्रशिक्षकच फिल्डींग करत असल्याचे पाहायला मिळाले.
इंग्लंडचा सध्या सराव सामना सुरु आहे तो पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी. या सामन्यात इंग्लंडचा खेळाडू मार्क वूड हा जायबंदी झाला आणि त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मैदानात बदली खेळाडू येइल, असे साऱ्यांना वाटले होते. पण बदली खेळाडू मैदानात येण्याऐवजी प्रशिक्षक फिल्डींग करायला उतरले आणि साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे प्रशिक्षक होते पॉल कॉलिंगवूड...
कॉलिंगवूड हे इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक आहेत, त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडचे कर्णधारपदही भूषवले होते. कॉलिंगवूड यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ट्वेन्टी-20 विश्वचषकाला गवसणी घातली होती.