Join us  

रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?

मॅचमध्ये ट्विस्ट आणणारा हा गेम प्लान नेमका कुणाचा असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 6:22 PM

Open in App

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली.  चेन्नई कसोटी सामन्यातील कामगिरी आणि  बांगलादेश विरुद्धचा यापूर्वीचा रेकॉर्ड यामुळे टीम इंडियाचे पारडे,जड होते. मॅच आधी कानपूरमध्ये पावसाने जी धुवाँधार बॅटिंग केली त्यामुळे अडीच दिवसांचा खेळ वाया गेला. परिणामी अखेरच्या दोन दिवसांत भारतीय संघ बाजी मारेल, वैगेरे कल्पनाही कुणी केली नसेल. पण जी गोष्ट अशक्य वाटत होती ती टीम इंडियाने करुन दाखवली. 

सामन्याला कलाटणी देणारा तो प्लान कुणाचा? कोच गौतम गंभीर की रोहित शर्मा?

चौथ्या दिवशी भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात टी-२० स्टाईल फटकेबाजी केली. हाच कानपूर कसोटी विजयातील टर्निंग पाइंट ठरला.  मॅचमध्ये ट्विस्ट आणणारा हा गेम प्लान नेमका कुणाचा असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. जिओ Live मॅच सेंटर शोमध्ये भारतीय संघाच्या ताफ्यातील फलंदाजी कोच अभिषक नायरला यासंदर्भातच प्रश्न विचारण्यात आला होता.  हा प्लान कोच गौतम गंभीरचा होता की कॅप्टन  रोहित शर्माचा? असे त्याला विचारण्यात आले होते. यावर त्याने रोहित शर्माचं नाव घेतलं. कॅप्टन रोहित शर्मानेच हा गेम प्लान आखला होता, असे तो म्हणाला.   

मॅचनंतर काय म्हणाला रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं देखील मॅच जिंकल्यावर भारतीय संघाच्या पहिल्या डावातील स्फोटक बॅटिंगसंदर्भातील प्लानची गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, चौथ्या दिवशी आम्ही मैदानात उतरलो त्यावेळी बांगलादेशच्या संघाला लवकर आटोपण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानंतर बॅटिंगमध्ये आम्ही बॅटिंगमध्ये काय करु शकतो तो ठरलं. फलंदाजीपेक्षा गोलंदाजीला किती वेळ देता येईल, यावर फोक होता. खेळपट्टी गोलंदाजांसाठी फारशी अनुकूल नव्हती.  

आम्ही जोखीम घेतली, कारण

बांगलादेशच्या संघाचा पहिला डाव आटोपल्यावर पहिल्या डावात जोखीम घेतली होती, हे देखील रोहित शर्मानं मान्य केले. तो म्हणाला की, आम्ही ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यात १००- १२० मध्ये ऑल आउट होण्याचीही रिस्क होती. पण रिझल्टसाठी आम्ही हा धोका पत्करला.  

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्मागौतम गंभीरबांगलादेश