Rohit Sharma Mumbai Indians IPL 2025 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माची ओळख आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएलमध्ये आपला दबदबा निर्माण केला. आयपीएल २०२५ च्या आधी या वर्षी मेगा लिलाव होणार आहे. अद्याप बीसीसीआयने खेळाडूंना कायम (रिटेन) ठेवण्याबाबत नियम जारी केलेले नाहीत. त्याआधी अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्माबद्दल असे बोलले जात आहे की तो नव्या संघात सामील होऊ शकतो. पंजाब किंग्जनेही हिटमॅनला आपल्या संघात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सचीही नजर त्याच्यावर आहे. अशातच लखनौ सुपर जायंट्सने रोहितला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रस दाखवला.
लखनौच्या संघाच्या क्षेत्ररक्षणाचा प्रशिक्षक जॉन्टी रोड्स म्हणाला की, जर रोहित शर्मा लिलावात आला तर त्याला खरेदी करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तो एक चांगला खेळाडू आहे. प्रत्येक संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. मात्र, भारताचा स्टार रविचंद्रन अश्विनने म्हटले होते की, सलामीवीर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची फ्रँचायझी सोडणार नाही असे मला वाटते. खरे तर मागील वर्षी रोहितला वगळून मुंबईच्या फ्रँचायझीने कर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात घातली. फ्रँचायझीचा हा निर्णय अनेक चाहत्यांना खटकला. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये हार्दिक पांड्याला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, पंजाब, दिल्ली आणि आता लखनौच्या फ्रँचायझीने रोहितला खरेदी करण्याची तयारी दर्शवली. पण, मुंबईची फ्रँचायझी रोहितला रिटेन करेल असे अपेक्षित आहे. त्यामुळे असे झाल्यास रोहित इतर कोणत्या संघात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आयपीएल २०२४ च्या हंगामात रोहितने बॅटने चांगली कामगिरी केली होती. त्याने या संपर्ण हंगामात ४१७ धावा केल्या. त्याने एक शतक आणि एक अर्धशतकही झळकावले. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनने १०५ धावांची शतकी खेळी करुन एकट्याने किल्ला लढवला होता. पंरतु, तो सामना मुंबईला जिंकता आला नाही.
रोहित हा मुंबई इंडियन्सच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. २०११ मध्ये फ्रँचायझीमध्ये सामील झाल्यानंतर रोहितने संघासाठी १९९ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १२९.८६ च्या स्ट्राईक रेटने ५,०८४ धावा केल्या. याशिवाय रोहितच्या नावावर १९५ डावांमध्ये एक शतक आणि ३४ अर्धशतकांची नोंद आहे.
Web Title: Coach Jonty Rhodes said, if Rohit Sharma comes into the auction, LSG is ready to welcome him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.