ठळक मुद्देकर्णधार म्हणून दोनवेळा 150 पेक्षा अधिक धावांची वैयक्तिक खेळी करणारा तो ( 160* व 157*) दुसरा खेळाडू ठरला आहे.
विशाखापट्टणम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीचाच बोलबाला राहिला. त्याने नाबाद 157 धावांची खेळी करताना भारताला 321 धावांचा पल्ला गाठून दिला. मात्र, विंडीजच्या शाय होपच्या ( नाबाद 123) फटकेबाजीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. होपने अखेरच्या चेंडूवर चौकार खेचून सामना बरोबरीत सोडवला.
या सामन्यात विराटने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने सर्वात जलद दहा हजार धावांचा पल्ला पार करत माजी कसोटीपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. या सामन्यात त्याने एक विक्रमही नावावर केला आहे. कर्णधार म्हणून दोनवेळा 150 पेक्षा अधिक धावांची वैयक्तिक खेळी करणारा तो ( 160* व 157*) दुसरा खेळाडू ठरला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्य्रू स्ट्रॉस ( 154 व 158) यानेही अशी कामगिरी केली आहे.
पण, हा योगायोग येथेच थांबत नाही. दोन्ही कर्णधारांना दुसऱ्या दीडशतकी खेळीच्या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा सामना बरोबरीत सुटला. स्ट्रॉसलाही दुसऱ्या दीडशतकी खेळीच्या सामन्यात अनिर्णीत निकालावर समाधान मानावे लागले होते. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 2011 साली बंगळुरु येथे सामना झाला होता. त्यात स्ट्रॉसने 158 धावांची खेळी केली होती. भारताच्या 338 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने 50 षटकांत 8 बाद 338 धावा केल्या होत्या.
Web Title: coincidence: it happened between Virat Kohli and Andrew Strauss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.