Join us  

३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गंभीरनं दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 9:32 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या टी-२० सामन्यातून वरुण चक्रवर्तीनं पुन्हा एकदा टीम इंडियाकडून कमबॅक केले. वरुण चक्रवर्ती तब्बल १०५८ दिवसांच्या कालावधीनंतर भारतीय ताफ्यातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. मैदानात उतरताच आधी त्याच्या नावे नकोसा विक्रम झाला.  

कमबॅकच्या सामन्यात वरुणच्या नावे झाला एक लाजिरवाणा विक्रम

वरुण चक्रवर्ती याने  २०२१ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर तो थेट २०२४ मध्ये मैदानात उतरला.  पदार्पणानंतर कमबॅकच्या सामन्या दरम्यान सर्वाधिक टी-२० सामन्याला मुकणारा तो दुसरा भारतीय ठरला. पदार्पणानंतर बराच काळ संघाबाहेर राहणाऱ्या खेळाडूंच्या यादीत खलील अहमद टॉपला आहे. २०२९ ते २०२४ या कालावधीत तो १०४ सामन्याला मुकला होता. यात तिसऱ्या क्रमांकावर संजू सॅमसनचा समावेश आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत संजू सॅमसन ७३ सामने तर २०२० ते २०२३ या कालावधीत शिवम दुबे ७० सामन्यांना मुकला आहे.  २०२१ च्या हंगामातील टी- वर्ल्डकपमध्ये खेळला होता अखेरचा आंतरारष्ट्रीय टी-२० सामना कमबॅकच्या सामन्यात भलेही लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावे झाला असेल पण यावेळी छाप सोडायलाही तो कमी पडला नाही. कमालीच्या कामगिरीसह निवडकर्त्यांनी विश्वास न दाखवता बाहेर ठेवून मोठी चूक केलीये, हेच त्याने दाखवून दिले. कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यातून आपल्या फिरकीतील जादू दाखवून देणाऱ्या वरुन चक्रवर्तीला  २०२१ मध्ये युएईत झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियात स्थान मिळाले होते. पण तिथं तो लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला होता. परिणामी त्याला कमबॅकसाठी मोठी प्रतिक्षा करावी लागली.  १४ सामन्यात २१ विकेट्स नावे असूनही झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यावरील टी-२० सामन्यात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पण गंभीरनं शेवटी त्याच्यावर विश्वास दाखवला अन् त्याने तो सार्थही ठरवला. 

पहिलं षटक ठरलं महागड, पण उर्विरत ३ षटकात घेतल्या ३ विकेट्स

बांगलादेश विरुद्धच्या ग्वाल्हेर टी-२० सामन्यात वरुण चक्रवर्तीनं फिरकीतील जादू दाखवून दिली. ४ षटकातील पहिल्या षटकात त्याने १५ धावा खर्च केल्या. पण उर्वरित ३ षटकात तिघांना तंबूचा रस्ता दाखवून त्याने आपल्यातील क्षमता दाखवून दिली. ३१ धावा खर्च करून त्याने या तीन विकेट्स घेतल्या.   

 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश