Join us  

अजब-गजब प्रकार! थर्ड अंपायर लिफ्टमध्ये अडकले अन् सामना सुरू व्हायला झाला उशीर, मग...

खेळाडू मैदानावर आले, पंच मैदानात आले पण खेळ काही सुरू होईना...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 6:16 PM

Open in App

Third Umpire, AUS vs PAK: ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील मेलबर्न येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने २४१ धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३१८ धावांत आटोपला. तर पाकिस्तानचा पहिला डाव २६४ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ बाद १८७ पर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाचा किपर अलेक्स कॅरी सध्या नाबाद आहे. आजच्या दिवसात एक मजेशीर गोष्ट घडली. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक नंतर खेळ सुरू होण्यास विचित्र कारणामुळे उशीर झाला.

नक्की काय घडले?

लंच ब्रेक संपल्यानंतर सर्व खेळाडू आणि मैदानावरील पंच मैदानावर आले, परंतु काही मिनिटे खेळ सुरू झाला नाही. कारण तिसरे पंच रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते आणि वेळेत त्यांच्या सेटअपमध्ये परत येऊ शकले नाहीत. खेळाडूंना विलंबाबद्दल अस्पष्टता होती आणि मैदानावरील पंचांनी त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. कालांतराने इलिंगवर्थ सेट अप पर्यंत पोहोचले आणि सामन्याला सुरुवात झाली.

दरम्यान, पाकिस्तान संघाचा कर्णधार शान मसूदने मेलबर्नमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत कांगारू संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१८ धावा फलकावर लावल्या. मार्नस लाबूशेनने संघाकडून सर्वाधिक ६३ धावा केल्या. पाकिस्तानकडून आमिर जमालने सर्वाधिक ३ बळी घेतले. पाकिस्तानलाही पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने २६४ धावांवर रोखले. अब्दुल्ला शफीकने सर्वाधिक ६२ धावा केल्या. कर्णधार शान मसूदनेही अर्धशतक (५४) केले. मोहम्मद रिझवानने ४२ धावांची तर आमिर जमालने ३३ धावांची चांगली खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने चांगली गोलंदाजी केली तर नॅथन लायनने ४ आणि जोश हेझलवूडने १ बळी टिपला. पाकिस्तानने गोलंदाजीत चांगले पुनरागमन केले. दुसऱ्या डावात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केला. अवघ्या 16 धावांवर ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिवस संपेपर्यंत ६ बाद १८७ पर्यंत मजल मारली आणि २४१ धावांची आघाडी घेतली.

टॅग्स :ऑफ द फिल्डआॅस्ट्रेलियापाकिस्तानसोशल व्हायरल