PAK vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. बाबर आझम पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे, तर पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी एक 'फाडू' किस्सा घडला. मैदानात क्षेत्ररक्षणासाठी आलेला पर्यायी खेळाडू शान मसूदची याची पॅन्ट फिल्डिंग करताना फाटली. त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. cricket.com.au ने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
--
--
--
--
--
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाने ४ बाद ४७६ धावा करून पहिला डाव घोषित केला. अझहर अलीने १८५ आणि इमाम-उल-हकने १५७ धावांचे योगदान दिले. दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी २०८ धावांची भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनीही प्रत्युत्तर देत पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. प्रथम डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी १५६ धावांची शानदार सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. ख्वाजाने ९७ आणि वॉर्नरने ६८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मधल्या फळीतील मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरॉन ग्रीन या फलंदाजांनीही चांगली फलंदाजी केली. लाबुशेनने ९० आणि स्टीव्ह स्मिथने ७८ धावा केल्या. तर कॅमेरून ग्रीन ४८ धावा करून बाद झाला.