Join us  

पाकिस्तानचा आशिया चषकात भारतावर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल 

पाकिस्तानच्या युवा संघाने रविवारी Asian Cricket Council Under-19s Asia Cup स्पर्धेत भारतावर दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 7:03 PM

Open in App

Asian Cricket Council Under-19s Asia Cup - पाकिस्तानच्या युवा संघाने रविवारी Asian Cricket Council Under-19s Asia Cup स्पर्धेत भारतावर दणदणीत विजय मिळवला. अझान अवैसचे शतक आणि साद बेगच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि अ गटात चार गुणांसह उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली. १९ वर्षांखालील वन डे सामन्यात पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा मोठा विजय आहे. गोलंदाजीत मोहम्मद झीशानने ४ विकेट्स, तर उबैद शाहने दोन विकेट्स घेतल्या.  प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ बाद २५९ धावा केल्या. सलामीवीर आदर्श सिंगने ६२ धावा केल्या,तर अर्शीन कुलकर्णीला आज २४ धावांचे योगदान देता आले. कर्णधार उदय सहरानने ९८ चेंडूंत ६० धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांना अपयश आले. सचिन दासने ४२ चेंडूंत ५८ धावा करताना संघाला सन्मानजनक पल्ला गाठून दिला. पाकिस्तानच्या मोहम्मद झिशान ( ४-४६), अमीर हसन ( २-५६), उबैद शाह ( २-४९) व अराफत मिन्हास ( १-४०) यांनी चांगली गोलंदाजी केली.

पण, भारताच्या गोलंदाजांच्या वाट्याला आज यश नव्हते. मुरुगन अभिषेकने पाचव्या षटकात पाकिस्तानचा सलामीवीर श्यामी हुसैनला ( ८) बाद केले. पण, साहजैब खान व अझान अवैस यांनी ११० धावांची केलेली भागीदारी महत्त्वाची ठरली. ६३ धावा करणाऱ्या खानला अभिषेकने माघारी पाठवले. कर्णधार साद बैगने अझानसह पाकिस्तानला विजय मिळवून दिला. अझान १३० चेंडूंत १० चौकारांसह १०५ धावांवर नाबाद राहिला, तर बैगनेही ५१ चेंडूंत नाबाद ६८ धावा केल्या. पाकिस्तानने ४७ षटकांत २ बाद २६३ धावा केल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कप 2023