जसप्रीत बुमराहच्या 'Coming Soon' पोस्टवर इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूची 'हॉट' रिअ‍ॅक्शन

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखातीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 03:21 PM2019-10-29T15:21:55+5:302019-10-29T15:22:24+5:30

whatsapp join usJoin us
'Coming soon,' Jasprit Bumrah hints at comeback in Indian side after injury; see England women cricketer reaction | जसप्रीत बुमराहच्या 'Coming Soon' पोस्टवर इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूची 'हॉट' रिअ‍ॅक्शन

जसप्रीत बुमराहच्या 'Coming Soon' पोस्टवर इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूची 'हॉट' रिअ‍ॅक्शन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या दुखातीतून सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुखापतीवर उपचारासाठी बुमराह लंडनमध्ये रवाना झाला होता आणि तेथे त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागण्याची शक्यता होती. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय)  बुमराहवर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचे सांगून चाहत्यांना दिलासा दिला. बुमराह पण टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तयारीला लागला आहे. त्यानं मंगळवारी सोशल मीडियावर जिममधील फोटो शेअर केला आणि त्यावर Coming Soon असा मॅसेज लिहिला.

बुमराहच्या या पोस्टवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच्या स्वागतासाठी आतूर असल्याची प्रतिक्रियाही नोंदवली. पण, या सर्व पोस्टमध्ये एक प्रतिक्रिया लक्षवेधी ठरत आहे. इंग्लंडच्या डॅनिएल वॅटनं बुमराहच्या पोस्टवर केलेली कमेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या प्रतिक्रियेवरही अनेकांनी वॅटची चांगलीच फिरकी घेतली.


दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्याबद्दल बीसीसीआयचे अपडेट, कधी खेळणार जाणून घ्या...
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्ध जेव्हा भारताचा संघ निवडण्यात आला तेव्हा त्यांचे पुनरागमन होईल, असे वाटत होते. पण या संघात मात्र या दोघांनाही स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर बीसीसीआयने या दोघांबाबत अपडेट दिले आहे.

आयपीएलमध्ये बुमराला दुखापत झाली होती. त्यानंतर तो विश्वचचषकात खेळला. पण वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचे म्हटले गेले होते. हार्दिकला आशिया चषकाच्यावेळी दुखापत झाली होती. त्यानंतर विश्वचषकात तो खेळला पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याला दुखापतीने ग्रासले. पण या दोघांची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे कळते. कारण या वर्षात हे दोघे एकही सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
  
 

Web Title: 'Coming soon,' Jasprit Bumrah hints at comeback in Indian side after injury; see England women cricketer reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.