Join us  

Commonwealth Games 2022 : भारतीय महिलांनी पक्कं केलं पदक; १९९८साली पुरुष संघाला आलेलं अपयश, त्या संघात कोण कोण होतं माहित्येय?

Commonwealth Games 2022 India vs England Cricket Semi Final : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 7:04 PM

Open in App

Commonwealth Games 2022 India vs England Cricket Semi Final : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला. १९९८नंतर राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन झाले अन् हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने पदक पक्के केले. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून हा टप्पा गाठला. पण, १९९८साली सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, अजय जडेजा या दिग्गजांना जे जमलं नाही ते भारतीय महिलांनी करून दाखवले. १९९८मध्ये भारतीय पुरुष संघात दिग्गजांचा भरणा अरूनही पदक जिंकता आले नव्हते.

स्मृती मानधनाने उपांत्य फेरीत विक्रमांचा पाऊस पाडला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्मृतीने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून स्वतःचाच ( २४ चेंडूंत अर्धशतक वि. न्यूझीलंड, २०१९) सर्वात जलद भारतीय महिला क्रिकेटपटूच्या अर्धशतकाचा विक्रम मोडला.  ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये अर्धशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. स्मृती व शेफाली वर्मा या ओपनर्सनी इंग्लंडची धुलाई  केली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या आणि आणखी एक विक्रम नावावर केला. भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १०००+ धावा जोडणारी ही पहिली महिला ओपनर्सची जोडी ठरली. शेफाली १५ धावांवर माघारी परतल्यानंतर स्मृतीही बाद झाली. तिने ३२ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकार खेचले. जेमिमा रॉड्रीग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताच्या धावसंख्येत भर घातली. हरमनप्रीत २०, दीप्ती शर्मा २२ धावांवर बाद झाली. रॉड्रीग्जने ३१ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ४४ धावा करताना भारताला ५ बाद १६४ धावांचा टप्पा गाठून दिला.

प्रत्युत्तरात इंग्लंडला ६ बाद  १६० धावा करता आल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावा हव्या असताना स्नेह राणाने ९ धावा दिल्या. इंग्लंडकडून कर्णधार नॅट शिव्हर ( ४१), एमी जोन्स ( ३१) व डॅनी वॅट ( ३५) यांनी संघर्ष केला. स्नेह राणाने दोन विकेट्स घेतल्या. भारताने अंतिम फेरीत प्रवेश करून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.

१९९८साली भारताचा संघ कसा होता?

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App