Join us  

Commonwealth Games 2022 : धक्कादायक! ऑस्ट्रेलियाने कोरोना पॉझिटीव्ह खेळाडूला मैदानावर उतरवले, Live मॅचमध्ये सत्य समोर आले

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women :  ९ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी सावरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 10:29 PM

Open in App

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women :  ९ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी सावरला आहे. या दोघींनी ऑसींना १० षटकात १ बाद ८३ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू ताहलिया मॅकग्राथ ( Tahlia McGrath) हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. तरीही डॉक्टरांचा, संघ व्यवस्थापनाचा व सामनाधिकारी यांच्या परवानगीने तिचा ऑसींच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोल्ड पदकासाठीच्या म‌ॅचमध्ये उघडकीस आला. 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. रेणुका शर्माच्या पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर एलिसा हिलीच्या बॅटला किनार लागून चेंडू स्लीपच्या दिशेने गेला, परंतु दीप्ती शर्मा खूप लांब उभी राहिल्याने ऑसींना चौकार मिळाला. दुसऱ्या षटकातही राधा यादवच्या गोलंदाजीवर बेथ मूनी थोडक्यात बचावली. २.२ षटकात रेणूकाच्या गोलंदाजीवर एलिसा हिलीसाठी LBW ची जोरदार अपील झाले. चेंडू पॅडच्या वरच्या बाजूला लागलेला दिसत होता, तरीही २ सेकंद शिल्लक असताना हरमनप्रीत कौरने DRS चा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. एलिसाला ७ धावांवर माघारी जावे लागले. ऑस्ट्रेलियाला ९ धावांवर पहिला धक्का बसला. 

पत्नीला चिअर करण्यासाठी मिचेल स्टार्क स्डेडियमवर आला, पण रेणुका सिंगने एलिसाची विकेट घेऊन त्याला निराश केले. पण, बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघींनी १० षटकांत १ बाद ८३ धावा केल्या. लॅनिंगने १०व्या षटकात हरमनप्रीत कौरच्या गोलंदाजीवर १७ धावा कुटल्या.  या दोघांची ४७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी ११व्या षटकात संपुष्टात आली. मेग लॅनिंग ३६ धावांवर रन आऊट झाली. त्यानंतर लॅनिंग फलंदाजीला आली, परंतु ती दोन धावांवर दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाली. ऑसींनी ८७ धावांत ३ फलंदाज गमावले. 

धक्कादायक... क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, कॉमनवेल्थ गेम ऑस्ट्रेलिया सांगू इच्छिते की ताहलिया मॅग्राथाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. CGA च्या स्टाफने या संदर्भात Commonwealth Games Federation RACEG शी चर्चा केली आणि मॅग्राथला अंतिम सामन्यात खेळण्याची परवानगी मिळाली. मॅग्राथमध्ये सौम्य लक्षण दिसत आहेत. पण, तिचा अंतिम ११ मध्ये समावेश केला गेला आहे. ICC, वैद्यकिय टीमसोबत याबाबत चर्चा केली आहे आणि योग्य नियमांचे पालन करूनच तिला खेळण्याची परवानगी मिळाली आहे.  

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघकोरोना वायरस बातम्या
Open in App