Join us  

Commonwealth Games 2022 : पत्नीला चिअर करण्यासाठी मिचेल स्टार्क स्डेडियमवर आला, पण रेणुका सिंगने त्याला ईंगा दाखवला

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सुवर्णपदकाच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 9:52 PM

Open in App

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सुवर्णपदकाच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता होती. त्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्क ( Mitchell Starc) हाही स्टेडियमला उपस्थित होता. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिसा हिली ( Alyssa Healy) ही त्याची पत्नी आहे आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्क स्टेडियमवर उपस्थित होता. पण, भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ( Renuka Singh Thakur) ने त्याला ईंगा दाखवला.

इंग्लंडवर थरारक विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्ण इतिहास लिहिण्याची संधी आहे. प्रथमच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून यापूर्वी १९९८ मध्ये पुरूष क्रिकेटला या स्पर्धेत स्थान मिळाले होते. तेव्हा भारतीय संघाला एकही पदक जिंकण्यात यश आले नव्हते. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये यजमान संघाने भारताचा पराभव केला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून भारताला हार मानावी लागली होती. हाताचा सामना भारताने गमावला होता आणि ती चूक आज टाळायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

रेणुका शर्माच्या पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर एलिसा हिलीच्या बॅटला किनार लागून चेंडू स्लीपच्या दिशेने गेला, परंतु दीप्ती शर्मा खूप लांब उभी राहिल्याने ऑसींना चौकार मिळाला. दुसऱ्या षटकातही राधा यादवच्या गोलंदाजीवर बेथ मूनी थोडक्यात बचावली. २.२ षटकात रेणूकाच्या गोलंदाजीवर एलिसा हिलीसाठी LBW ची जोरदार अपील झाले. चेंडू पॅडच्या वरच्या बाजूला लागलेला दिसत होता, तरीही २ सेकंद शिल्लक असताना हरमनप्रीत कौरने DRS चा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. एलिसाला ७ धावांवर माघारी जावे लागले. ऑस्ट्रेलियाला ९ धावांवर पहिला धक्का बसला. 

एलिसा व मिचेलची प्रेम कहाणीएलिसाचे वडील ग्रेग हे ऑस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते. एलिसा व मिचेल नऊ वर्षांचे असताना एका क्रिकेटस्पर्धेदरम्यान एकमेकांना भेटले होते. दोघांनीही ११ वर्षांखालील संघात यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाभली होती. नंतर सहा वर्षे हे दोघे एकत्र खेळले. यादरम्यान दोघांमध्येही घट्ट मैत्री निर्माण झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

ऑस्ट्रेलियन संघ - एलिसा हिली, बेथ मूनी, मेग लॅनिंग, ताहलीया मॅग्राथ, राचेल हायनेस, एश्लेघ गार्डनर, ग्रेस हॅरीस, जेस जॉनासेन, अॅलना किंग, मेगन शट, डार्सिए ब्राऊन 

भारतीय संघ - स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, हरमनप्रीत कौर, तानिया भाटीया, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, मेघना सिंग, राधा यादव, रेणुका सिंग 

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App