Join us  

Commonwealth Games 2022 : दीप्ती शर्माचा वन हँडेड कॅच, राधा यादवचा अप्रतिम झेल अन् रन आऊट; भारताची ऑसींवर पकड, Video 

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : बेथ मूनी व कर्णधार मेग लॅनिंग यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला, परंतु राधा यादवने अप्रतिम रन आऊट व सुरेख झेल टिपून पुनरागमन करून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 11:04 PM

Open in App

Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : बेथ मूनी व कर्णधार मेग लॅनिंग यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला, परंतु राधा यादवने अप्रतिम रन आऊट व सुरेख झेल टिपून पुनरागमन करून दिले. रेणुका सिंग ठाकूरने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करताना ऑसींच्या धावगतीवर लगाम लावण्याचा प्रयत्न केला. पण, बेथ मूनी ऐकायला तयार नव्हती, तिने अर्धशतकी खेळी करून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. दीप्ती शर्माने अफलातून झेल घेत मूनीला बाद केले. 

धक्कादायक! ऑस्ट्रेलियाने कोरोना पॉझिटीव्ह खेळाडूला मैदानावर उतरवले, Live मॅचमध्ये सत्य समोर आले

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. २.२ षटकात रेणूकाच्या गोलंदाजीवर एलिसा हिलीसाठी LBW ची जोरदार अपील झाले. चेंडू पॅडच्या वरच्या बाजूला लागलेला दिसत होता, तरीही २ सेकंद शिल्लक असताना हरमनप्रीत कौरने DRS चा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. एलिसाला ७ धावांवर माघारी जावे लागले. ऑस्ट्रेलियाला ९ धावांवर पहिला धक्का बसला. पत्नीला चिअर करण्यासाठी मिचेल स्टार्क स्डेडियमवर आला, पण रेणुका सिंगने एलिसाची विकेट घेऊन त्याला निराश केले.  बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघींनी १० षटकांत १ बाद ८३ धावा केल्या. लॅनिंगने १०व्या षटकात हरमनप्रीत कौरच्या गोलंदाजीवर १७ धावा कुटल्या.  या दोघांची ४७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी ११व्या षटकात संपुष्टात आली. मेग लॅनिंग ३६ धावांवर रन आऊट झाली. त्यानंतर लॅनिंग फलंदाजीला आली, परंतु ती दोन धावांवर दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाली. ऑसींनी ८७ धावांत ३ फलंदाज गमावले. अॅश्लेघ गार्डनरने चौथ्या विकेटसाठी मूनीसह झटपट २४ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. पण, स्नेह राणाने तिची विकेट घेतली. गार्डनर १५ चेंडूंत २ चौकार व १ षटकारासह २५ धावांत तंबूत परतली. 

बेथ मूनी एका बाजूने खिंड लढवत होती. तिने चौकार खेचून ट्वेंटी-२०तले १३ वे आणि भारताविरुद्धचे पाचवे अर्धशतक पूर्ण केले. १७व्या षटकात धावांची गती वाढवण्याच्या प्रयत्नात ग्रेस हॅरीसने ( २) उत्तुंग फटका मारला अन् मेघना सिंगने तितकाच जबरदस्त झेल टिपला. दीप्ती शर्माने वन हँडर झेल घेताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. बेथ मूनी ४१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६१ धावांवर माघारी परतली. रेणूकाने आज दोन विकेट्स घेत स्पर्धेत सर्वाधिक ११ विकेट्सचा विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६१ धावा केल्या.
टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App