IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 06:38 PM2022-07-31T18:38:34+5:302022-07-31T18:47:09+5:30

whatsapp join usJoin us
Commonwealth Games 2022 Indian women cricket team won tha match against pakistan by 8 wickets | IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

IND-W vs PAK- W:स्मृती मानधनाची अर्धशतकीय खेळी; भारताने पाकिस्तानवर मिळवला मोठा विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धांचा थरार दिवसेंदिवस रंगत चालला आहे. आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. पावसाच्या विलंबामुळे सामना १८-१८ षटकांचा खेळवण्यात आला आणि पॉवरप्ले फक्त ५ षटकांचा ठेवण्यात आला होता. पाकिस्तानच्या संघाने भारताला दिलेल्या १०० धावांचे आव्हान भारताने सहज पार केले आणि मोठा विजय मिळवला. भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक नाबाद ६३ धावांची खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. पाकिस्तानच्या संघाने १९ षटकात सर्वबाद ९९ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने आक्रमक सुरूवात केल्याने फक्त ११.४ षटकात १०२ धावा करून आणि ८ गडी राखून विजयावर शिक्कामोर्तब केला. भारताकडून शेफाली वर्माने १६ तर एस मेघनाने १४ धावा केल्या. 

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवण्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना अपयश आले. भारताकडून स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले आहेत. तर मेघना सिंग, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी पटकावण्यात यश आले आहे. तर आलिया रियाज आणि ओमामा सोहेल या दोघीही धावबाद झाल्या. पाकिस्तानकडून तुबा हसन वगळता कोणत्याच गोलंदाजाला बळी पटकावण्यात यश आले नाही. 

भारतीय गोलंदाजांचा बोलबाला
पाकिस्तानच्या संघाला पहिल्या ११.३ षटकांमध्ये ४ बाद केवळ ६४ धावा करता आल्या होत्या त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवून पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ १९ चेंडूत १७ धावांवर असताना स्नेह राणाने तिला बाद केले. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक ३२ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण स्नेह राणाने पाकिस्तानच्या आशेवर पाणी टाकले. इरम जावेद आणि डायना बेग या पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - 
बिस्माह महरूफ (कर्णधार), मुनीबा अली, इरम जावेद, ओमामा सोहेल, आयेशा नसीम, आलिया रियाज, कैनत इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन. 

Web Title: Commonwealth Games 2022 Indian women cricket team won tha match against pakistan by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.