Join us  

IND-W vs PAK- W:भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तान चितपट! भारतासमोर विजयासाठी १०० धावांचे आव्हान 

आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 5:58 PM

Open in App

बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धांचा थरार दिवसेंदिवस रंगत चालला आहे. आज क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघ 'करा किंवा मरा'च्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध मैदानात उतरला आहे. पाकिस्तानच्या संघाची सुरूवात निराशाजनक झाली होती. पावसाच्या विलंबामुळे सामना १८ षटकांचा खेळवला जात असून पॉवरप्लेमध्ये आता फक्त पाच षटके असणार आहेत. पाकिस्तानच्या संघाने १८ षटकात सर्वबाद ९९ धावा करून भारताला विजयासाठी १०० धावांचे आव्हान दिले आहे. 

तत्पूर्वी, पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी पटकावले आहेत. तर मेघना सिंग, शेफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांना प्रत्येकी १-१ बळी पटकावण्यात यश आले आहे. तर आलिया रियाज आणि ओमामा सोहेल या दोघीही धावबाद झाल्या. 

भारताच्या गोलंदाजांचा बोलबाला 

पाकिस्तानच्या संघाला पहिल्या ११.३ षटकांमध्ये ४ बाद केवळ ६४ धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा कायम ठेवून पाकिस्तानच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह महरूफ १९ चेंडूत १७ धावांवर असताना स्नेह रानाने तिला बाद केले. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक ३२ धावांची खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण स्नेह राणाने पाकिस्तानच्या आशेवर पाणी टाकले. इरम जावेद आणि डायना बेग या पाकिस्तानच्या फलंदाजांना आपले खातेही उघडता आले नाही. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा.

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ - बिस्माह महरूफ (कर्णधार), मुनीबा अली, इरम जावेद, ओमामा सोहेल, आयेशा नसीम, आलिया रियाज, कैनत इम्तियाज, फातिमा सना, तुबा हसन, डायना बेग, अनम अमीन. 

 

टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाभारतीय महिला क्रिकेट संघभारतपाकिस्तानबीसीसीआय
Open in App