- सुनील गावसकर लिहितात...
रविवारपासून प्रारंभ होणा-या वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारत विरुद्ध मनोधैर्य उंचावलेला श्रीलंका संघ खेळेल, अशी आशा आहे. सामना पांढ-या चेंडूने खेळला जाणार असल्यामुळे वेगवान गोलंदाज मोजक्याच वेळी चेंडू स्विंग करण्यात यशस्वी ठरतील. अशा स्थितीत विकेट घेण्यापेक्षा धावा रोखण्यावर अधिक भर राहील. यष्टिरक्षकांनाही धावा रोखण्यासाठी बरीच धावपळ करावी लागणार आहे. त्याचसोबत बाऊन्सर टाकणेही कठीण राहील. कारण चेंडू अधिक उसळला तर वाईडही ठरेल आणि फलंदाजी करणाºया संघाला अतिरिक्त एक धावही मिळेल. या पार्श्वभूमीवर क्षेत्ररक्षण करणारे संघ कसोटी सामन्यांच्या तुलनेत वेगळे असतील. सीमारेषा छोटी असल्यामुळे षटकारांवर नियंत्रण राखणे कठीण होईल. बॅट व बॉलच्या या खेळात दृष्टिकोनाला अधिक महत्त्व आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध स्टम्प्स सोडून फटके मारत असल्याची बाब आता नित्याची झाली आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये असे केले तर फलंदाजाला पळकुटा समजले जाते.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील लढतीच्या आठवणीमुळे श्रीलंका संघ या लढतीत उंचावलेल्या मनोधैर्यासह पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील राहील . त्यावेळी श्रीलंकेने भारताविरुद्ध ३२० धावांचे विशाल लक्ष्य सहजपणे गाठले होते.
भारतीय संघ या मालिकेत कसोटी सामन्यांच्या तुलनेत वेगळ्या गोलंदाजांसह उतरणार आहे. येथे बुमराहकडे चांगला अनुभव असून त्याच्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो. फलंदाजीबाबत विचार करता राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त फलंदाजी क्रमामध्ये विशेष बदल होण्याची शक्यता धुसर आहे. केवळ कर्णधार वरच्या फळीत फलंदाजी करण्याची शक्यता आहे.
उदाहरण द्यायचे झाल्यास आघाडीच्या तीन फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली आणि केवळ सहा षटके शिल्लक आहेत अशा
स्थितीत दुसरी विकेट गेल्यानंतर राहुल किंवा धोनी फलंदाजीला येईल ? याबाबत निवड समितीने निश्चित केलेली रणनीती कायम राखयची किंवा नाही, याचा निर्णय कर्णधार कोहली घेईल. , अशी आशा आहे. कदाचित मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यजमान संघ भारतापुढे आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरेल. (पीएमजी)
Web Title: Compared to the Test series, one-day series will have a lot of excitement between the two teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.