सुनील गावसकर लिहितात...आयपीएलपूर्वीच्या काळात रणजी ट्रॉफी संघांदरम्यान प्रतिस्पर्धा अनुभवायला मिळत होती. ही प्रतिस्पर्धा शेजारी संघांदरम्यान अधिक दिसून येत होती. हा विषय बाजूला ठेवत भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली एकमेकांविरुद्ध खेळले. आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमात दोन शेजारी राज्य तामिळनाडू व कर्नाटक संघांदरम्यान सलामी लढत खेळली गेली आहे. अशीच एक प्रतिस्पर्धा मुंबई व पुणे संघांदरम्यान अनुभवायला मिळत होती, पण आता पुणे संघ आयपीएलमध्ये नाही. चेन्नई व कर्नाटक संघांदरम्यानच्या सलामी लढतीनंतर मुंबई व दिल्ली या प्रतिस्पर्धी संघांदरम्यान रविवारी लढत रंगणार आहे.काही वेगळ्या कारणांमुळे मुंबई आणि दिल्ली संघांदरम्यान क्रिकेटमध्ये भारत-पाक संघांसारखी प्रतिस्पर्धा असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे, पण दोन शेजारी देशांदरम्यान क्रिकेट मैदानावर लढती होत नसल्यामुळे प्रतिस्पर्धा कमी झाली आहे. अगदी त्याचप्रमाणे मुंबई व दिल्ली संघांदरम्यानच्या फरकामुळे उभय संघांदरम्याची प्रतिस्पर्धा कमी झाल्याचे दिसून येते. दरम्यान, आयपीएलमध्ये संघातील खेळाडू पूर्ण भारतासह विदेशातीलही असतात त्यामुळे प्रतिस्पर्धा ही संघापेक्षा खेळाडूंदरम्यान असल्याचे अनुभवायला मिळते.मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ विजयाने सुरुवात करण्यास प्रयत्नशील आहे. मुंबई संघाने २०१३ पासून वर्षाच्या अंतराने चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदा त्यांना संधी आहे. यंदाच्या लिलाव प्रक्रियेमध्येही मुंबई संघाने खेळाडूंवर मोठ्या हुशारीने बोली लावली होती. सलामीवीर रोहित शर्मा जेव्हा फॉर्ममध्ये असेल तेव्हा त्याला रोखणे अशक्य ठरेल. गत स्पर्धेतील कामगिरी बघता मुंबई संघ स्पर्धेत स्लो स्टार्टर असल्याचा अनुभव आहे, पण यावेळी ते हा ट्रेंड मोडून काढण्यास प्रयत्नशील असतील.दिल्ली संघाची गेल्या काही मोसमातील कामगिरी निराशाजनक ठरली आहे. त्यामुळे ते आश्चर्यकारक कामगिरी करीत छाप सोडण्यास उत्सुक आहे. अन्यथा माझ्या मते पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघ बाजी मारेल. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- संघांपेक्षा खेळाडूंदरम्यान प्रतिस्पर्धा
संघांपेक्षा खेळाडूंदरम्यान प्रतिस्पर्धा
आयपीएलपूर्वीच्या काळात रणजी ट्रॉफी संघांदरम्यान प्रतिस्पर्धा अनुभवायला मिळत होती. ही प्रतिस्पर्धा शेजारी संघांदरम्यान अधिक दिसून येत होती.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 1:27 AM