मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना इंदूर येथे सुरु झाला आहे. भारताने या सामन्यात चांगली सुरुवातही केली आहे. पण सध्याच्या घडीला भारताच्या एका खेळाडूच्या विरोधात बीसीसीआयमध्ये तक्रार करण्यात आली आहे. यावेळी बीसीसीआयचे ट्रेनरही बंडाच्या प्रतिक्षेत असल्याचे म्हटले जात आहे.
सध्याच्या घडीला या क्रिकेटपटूकडून बीसीसीआयच्या सह सचिवांनी या प्रकरणाबाबत आपले उत्तर मागवले आहे. हे पूर्ण प्रकरण आणि दोन्ही बाजूंची मतं बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यामध्ये या प्रकरणाबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.
भारताचे माजी खेळाडू साबा करिम यांच्याविरोधात बीसीसीआयच्या ट्रेनर यांनी बंड पुकारले असल्याचे चिन्ह आहे. कारण आता त्यांच्याबरोबर आम्हाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये काम करायचे नाही, असे ट्रेनर यांनी म्हटले आहे. याबाबत बीसीसीआयचे सह सचिव जयेश जॉर्ज यांनी साबा करिम आणि तुफान घोष यांच्याकडून याप्रकरणी उत्तर मागितले आहे.