Join us  

भारतीय संघात 'या' गोष्टी ठरतायत चिंतेचा विषय; सांगतायत सहाय्यक प्रशिक्षक

भारतीय संघ एकोकाळी फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2019 3:29 PM

Open in App

मुंबई : भारताने वेस्ट इंडिजमध्ये सर्व मालिका जिंकल्या. या मालिका जिंकत भारताच्या संघाने काही विक्रमही रचले. पण तरीही भारतीय संघात काही चिंतेचे विषय आहेत, असे मत भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी व्यक्त केले आहे.

राठोड यांची भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली होती. यापूर्वी पाच वर्षे भारताचे फलंदाजी प्रशिक्षकपद संजय बांगर यांनी सांभाळले होते. पण विश्वचषकानंतर विविध प्रशिक्षकपदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतीही झाल्या आणि त्यानंतर राठोड यांची संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

भारतीय संघ एकोकाळी फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. पण आता भारतीय फलंदाजीमध्ये काही समस्या जाणवत असल्याचे संकेत राठोड यांनी दिले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीचा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीचा प्रश्न मोठआ आहे, असे राठोड यांना वाटते.

याबाबत राठोड म्हणाले की, " भारताच्या कसोटी संघात सलामीचा प्रश्न महत्वाचा आहे. कारण कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीरांना थोडे जास्त महत्व असते. सध्याच्या घडीला आपण कसोटी संघातील सलामीवीर निश्चित करू शकलेलो नाही. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटच्या संघात मधल्या फळीची समस्या आहे. काही दिवसांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये क्रिकेट मालिका सुरु होणार आहेत. यावेळी या समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल."

टॅग्स :बीसीसीआयभारत