आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. यूएईत १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खेळवल्या जाणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवले गेले आहे. २४ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये सामना होणार आहे. भारत व पाकिस्तान यांनी प्रत्येकी एकेक वेळा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. आयसीसीनं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनं टीम इंडियाला डिवचले.
२००९ साली श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांचे आंतरराष्ट्रीय सामने यूएईतच खेळावे लागले होते. अशात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत होत असल्याचा फायदा पाकिस्तानलाच मिळेल, असा दावा आजमनं केला. यूएई हे आमच्या घरचंच मैदान आहे, असे म्हणत त्यानं टीम इंडियाला इशारा दिला. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं पाचही वेळेस पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली आहे.
सुपर १२ फेरीतील संघ
- गट १ - ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
- गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.
जाणून घ्या पाकिस्तानचे वेळापत्रक
- २४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
- २६ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. न्यूझीलंड, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता
- २९ ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
- २ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. अ गटातील उपविजेता, अबु धाबी, सायंकाळी ७.३० वाजता
- ७ नोव्हेंबर - पाकिस्तान वि. ब गटातील अव्वल, शाहजाह, सायंकाळी ७.३० वाजता