BCCI New TEAM : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) तिजोरीच्या चाव्या आता भाजपा नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांच्याकडे असणार आहेत. आशिष शेलार हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतही उतरले आहेत, परंतु आता त्यांनी BCCI चे खजिनदारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. BCCI ची १८ ऑक्टोबरला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे आणि त्यात औपचारिक घोषणा होईल. पण, त्याआधी भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोशल मीडियावरून शेलार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सौरव गांगुलीची 'विकेट' कोणी घेतली? MS Dhoniशी जवळचे संबंध असलेली व्यक्ती खरी सूत्रधार?
सौरव गांगुलीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य रॉजर बिन्नी हे विराजमान होणे निश्चित आहे. '' मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांची भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या खजिनदार पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,''असे ट्विट मुनगंटीवार यांनी केले आहे.
बीसीसीआयची नवी टीम
- अध्यक्ष - रॉजर बिन्नी ( कर्नाटक)
- सचिव - जय शाह ( गुजरात)
- उपाध्यक्ष - राजीव शुक्ला ( उत्तर प्रदेश)
- खजिनदार - आशिष शेलार ( महाराष्ट्र)
- सर चिटणीस - देवाजित सैकिया ( आसाम)
- आयपीएल चेअरमन - अरुण धुमाळ ( हिमाचल प्रदेश)
''रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे, तर मी उपाध्यक्षपदासाठी. जय शाह यांनी सचिवपदासाठी आणि आशिष शेलार व देवाजित यांनी अनुक्रमे खजिनदार व सरचिटणीस पदासाठी अर्ज दाखल केला आहे,''अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली. ते पुढे म्हणाले,''अरुण धुमाळ हे आयपपीएल गव्हर्निंग काऊंसिलवर जातील आणि अविशेष दालमिया या काऊंसिलचे सदस्य असतील. आतापर्यंत तरी सर्व सदस्य बिनविरोध आहेत.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"