भारतीय संघाला आक्रमकपणा शिकवणारा कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं बायोपिकसाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता लवकरच भारताच्या माजी कर्णधाराचा पडदा मोठ्या पदड्यावर दिसणार आहे. मोठ्या बॅनरच्या नावाखाली हा चित्रपट तयार केला जाणार असून त्याचा बजेट २०० ते २५० कोटींचा असल्याचे सांगितले जात आहे.
''बायोपिक बनवण्यासाठी मी तयार झालो आहे. हिंदीत हा चित्रपट असेल, परंतु त्याचं दिग्दर्शन कोण करेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही. सर्वांची जुळवाजुळव करण्यासाठी आणखी काही दिवस लागतील,''असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी News18शी बोलताना सांगितले.
गांगुलीच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या चित्रपटाची कथा लिहिण्याचं काम सुरू आहे. अनेक प्रोडक्शन हाऊस यासाठी सौरव गांगुलीशी चर्चा करत आहेत. पण गांगुलीची भूमिका कोण बजावणार? रणबीर कपूर याचे नाव सध्या आघडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Ranbir Kapoor is the ‘hot choice’ to play the role of Dada) गांगुलीनं स्वतःही रणबीरच्या नावाचा उल्लेख केला, परंतु या भूमिकेसाठी आणखी दोन अभिनेत्यांची नावं चर्चेत आहेत. गांगुलीचा संपूर्ण प्रवास या बायोपिकमधून दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट कधी रिलीज होईल, याचीही तारीख ठरलेली नाही.