काँग्रेस प्रवक्ता शमा मोहम्मद या भारतीय कर्णधार रोहित शर्मासंदर्भातील वक्तव्यामुळे वादात सापडल्या आहेत. एका बाजूला त्यांच्या वक्तव्यावरून चहूबाजूंनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना त्यांनी आपण आपल्या त्या वक्तव्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया दिलीये. जे आहे तेच बोलले. त्यात चुकीच काही वाटत नाही, असे म्हणत स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी माजी भारतीय कर्णधारांसह लोकशाहीचा दाखलाही दिलाय. जाणून घेऊयात रोहित शर्मासंदर्भातील वादग्रस्त कमेंटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आता काय म्हटलंय त्यासंदर्भातील सविस्तर गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मासंदर्भातील कमेंटमुळे काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद अडकल्यात वादात
काँग्रेस नेत्या शमा मोहम्मद यांनी एक्स अकाउंटवरील एका ट्विटच्या माध्यमातून रोहित जाडा आणि अनफिट खेळाडू आहे, अशी कमेंट केली होती. भारतीय कॅप्टनवरील त्यांची ही कमेंट बॉडी शेमिंगची आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर हिटमॅनच्या फॅट अन् फिटनेसवरील कमेंटमुळे काँग्रेस महिला प्रवक्त्या असलेल्या शमा मोहम्दम यांना रोहितच्या चाहत्यांनी ट्रोलिंग करण्यासही सुरुवात केली आहे. एवढेच नाहीतर भाजपकडूनही त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. या प्रकरणावर आता शमा मोहम्मद यांच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. एएनआयशी संवाद साधताना शमा मोहम्मद यांनी रोहित संदर्भातील वक्तव्यात वाद निर्माण होण्यासारख काही वाटतं नाही, असे म्हटले आहे.
वादग्रस्त कमेंटवर स्पष्टीकरण देताना लोकशाहीचा दाखला; जे आहे तेच बोलले अन् ते
रोहित संदर्भातील ट्विटवर शमा मोहम्मद म्हणाल्या आहेत की, खेळाडूच्या फिटनेससंदर्भातील हे एक सामान्य ट्विट होते. ते बॉडी शेमिंग नाही. खेळाडू हा फिट असायला हवा. आणि मला वाटते की त्याचे (रोहित शर्मा) वजन थोडे अधिक आहे. त्यामुळे मी ते बोलले. या मुद्यावरून विनाकारण माझ्यावर हल्लोबोल केलाय जातो. लोकशाहीनं मला बोलण्याचा अधिकार दिलाय. जे बोलले त्यात चूक काय? अशा स्पष्टीकरणासह त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
माजी क्रिकेटरसोबत केली रोहितची तुलना, विराट भारी कॅप्टन
शमा मोहम्मद यांनी यावेळी रोहित शर्माची तुलना भारताच्या माजी कर्णधाराशीही केलीये. यावेळी त्यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, कपिल देव, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि एमएस धोनीसह विराट कोहलीचे नाव घेतले. कोहली हा चांगला कॅप्टन आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
Web Title: Congress leader Shama Mohammed On her comment on Indian Cricket Team Captain Rohit Sharma Says It Was A Generic Tweet About The Fitness Of A Sportsperson It Was Not Body Shaming
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.