लिंग्टन : क्रिकेटमध्ये रणनीती महत्त्वपूर्ण ठरते. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अथवा गोलंदाजांवर वरचढ होण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जातात. अशीच वेगळी रणनीती न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे याने वापरली. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तयारी म्हणून कॉनवे खेळपट्टीवर चक्क कचरा टाकून फलंदाजीचा सराव करीत आहे.१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या साउथम्पटनवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाण्यासाठी डेवोन कॉनवे खेळपट्टीवर कचरा टाकून फलंदाजीचा सराव करतो. यामुळे येणारा प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने खेळावा हे कोडे उलगडू शकेल. या सामन्याआधी न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. पहिला सामना २ जूनला लंडन येथे तर दुसरा सामना १० जूनला खेळविण्यात येईल.योजनेप्रमाणे तयारी केल्यास आपण सामन्यात चांगली कामगिरी करू शकतो, असे कॉनवेने सांगितले. कॉनवेने न्यूझीलंडकडून आतापर्यंत तीन एकदिवसीय आणि १४ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि एका अर्धशतकासह त्याच्या २२५ धावा आहेत. टी-२० मध्ये या फलंदाजाने ४७३ धावा केल्या आहेत. या प्रकारात त्याने चार अर्धशतके ठोकली. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला २०२१-२२ या वर्षासाठीच्या २० खेळाडूंच्या केंद्रीय करार यादीमध्ये स्थान दिले आहे.- २९ वर्षांचा डावखुरा फलंदाज कॉनवे या दौऱ्यात कसोटी क्रिकेट पदार्पण करण्याची शक्यता आहे. ‘खेळपट्टीवर कचरा पसरवून वेगात वळण घेणारा चेंडू चांगला खेळता येईल. विशेषत: साउथम्प्टनमध्ये जर पावलांच्या खुणांमुळे चेंडू फिरला, तर अशा पद्धतीने खेळायचा सराव असेल. जगात अव्वल असलेली भारतीय फिरकी गोलंदाजी खेळणे सोपे नाही. योजनेप्रमाणे तयारी केल्यास आपण सामन्यात चांगली कामगिरी करू शकतो, असे कॉनवेने सांगितले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय फिरकीला सामोरे जाण्याआधी कॉनवेचा पीचवर कचरा टाकून सराव, भारतीय फिरकीला तोंड देणे आव्हानात्मक
भारतीय फिरकीला सामोरे जाण्याआधी कॉनवेचा पीचवर कचरा टाकून सराव, भारतीय फिरकीला तोंड देणे आव्हानात्मक
१८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडच्या साउथम्पटनवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाण्यासाठी डेवोन कॉनवे खेळपट्टीवर कचरा टाकून फलंदाजीचा सराव करतो.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 10:12 AM