नवी दिल्ली : कोरोनामुळे भारताचा पुढील महिन्यात होणारा श्रीलंका दौरा स्थगित करण्यात आला आहे. या दौऱ्यात भारताला प्रत्येकी तीन वन डे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळायची होती. तथापि याचवर्षी हा दौरा नव्याने आयोजित होण्याची बीसीसीआयला अपेक्षा आहे.
पुढील महिन्यात बांगलादेश संघालादेखील श्रीलंका दौरा करायचा आहे, मात्र तेथील कोरोनाची स्थिती पाहता बांगलादेश संघ श्रीलंकेत जाईल, असे वाटत नाही. ‘भारतीय खेळाडूंनी अद्याप सराव सुरू केलेला नाही. सराव सुरू केल्यानंतर मॅच फिटनेससाठी खेळाडूंना किमान चार ते सहा आठवडे लागतील. अशा स्थितीत मालिका खेळणे शक्य नाही. सध्या प्रवासबंदी कायम असताना आमचा संघ दौरा करू शकणार नाही,’ असे धुमल म्हणाले. श्रीलंका बोर्डानेदेखील भारताने प्रस्तावित दौरा रद्द केल्याची माहिती, एका पत्रकाद्वारे दिली.च्एकीकडे वेस्ट इंडिज संघ इंग्लंड दौºयावर आला आहे. उभय संघांमध्ये पुढील महिन्यात कसोटी मालिकेचे आयोजन होईल. दुसरीकडे भारताचा लंका दौरा स्थगित होणे आश्चर्यकारक मानले जाते. जुलैमध्ये श्रीलंका दौºयावर जाण्याआधी बीसीसीआयने सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यानुसार कोरोनाचा प्रकोप वाढत असून आतापर्यंत८ हजार बळी गेले आहेत. जून-जुलै महिन्यात दौरा करणे योग्य नाही, मात्र याचवर्षी दौºयाची नव्याने योजना आखू ,’असे बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला कळविले आहे.