कोरोना व्हायरसमुळे देशातील क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) भवितव्य अंधातरी पडलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) तीनवेळा आयपीएल पुढे ढकलावी लागली. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारल्यास सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये बीसीसीआय आयपीएल खेळवण्यास उत्सुक आहे. पण, आता क्रिकेट स्पर्धा सुरू करायच्या का, असा पुनर्विचार करणारी घटना घडली आहे. क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्यालाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
बंगाल क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य सागरमॉय सेनशर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले. ''त्यांची पत्नी पहिली कोरोना पॉझिटिव्ह झाली. त्या बऱ्या होऊन घरी परतल्या आणि सेनशर्मा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. घरातील अन्य सदस्यांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत,'' असे दालमिया यांनी सांगितले.
सेनशर्मा हे बंगालच्या 1989-90च्या रणजी करंडक विजेत्या संघाचे सदस्य होते आणि बंगाल क्रिकेट असोसिएशननं त्यांचे सर्व देय दिले आहेत. 54 वर्षीय सेनशर्मा यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी 344 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आणि तेथील कोरोना रुग्णांची संख्या 4536 इतकी झाली आहे. आतापर्यंत 223 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 60 लाख 45,653 इतकी झाली आहे. त्यापैकी 26 लाख 71,440 रुग्ण बरे झाले असून 3 लाख 67,116 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 74,020 इतकी झाली आहे. 82,676 रुग्ण बरे झाले असले तरी 4981 जणांना मृत्यू झाला आहे.
मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!
बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!
कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली
युवराज सिंगचं मुंबईतील घर लय भारी; विराट कोहलीच्या घरापेक्षा डबल महाग!