Join us

Corona Virus : इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत

इंग्लंडच्या काही खेळाडूंनी वैयक्तिक स्तरावरही मदत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 13:48 IST

Open in App

इंग्लंडच्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंनी कोरोना व्हायरशसी मुकाबला करण्यासाठी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. इंग्लंडच्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंनी त्यांच्या पगारात कपात करून जवळपास 5 लाख पाऊंड म्हणजेच 4 कोटी 68 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं खेळाडूंच्या पगारात 20 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि खेळाडूंनी त्यावर होकार दिला आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाला आता संलग्न क्रिकेट संघटनांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे.

खेळाडूंच्या एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या पगारात 20 टक्के कपात करण्यात येणार आहे. ''करारबद्ध खेळाडूंशी झालेल्या बैठकीत सर्व खेळाडूंनी समाजकार्यासाठी पगार कपातीचा प्रस्ताव मान्य केला,'' अशी माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळानं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. ''जमा होणारी रक्कम कोणाला दान करायची, याचा निर्णय खेळाडू पुढील आठवड्यात घेतील. ही पगार कपात 20 टक्के इतकी आहे,'' असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले.

इंग्लंड संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज जोस बटरलनं 2019च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाची जर्सीचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून उभी राहणारी रक्कम कोरोना व्हायरशी मुकाबला करण्यासाठी दिली जाईल. शिवाय महिला संघाची कर्णधार हिदर नाइट नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये वॉलेंटियर म्हणून सहभागी झाली आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बाप रे बाप... फॉर्म्युला वनचा माजी बॉस 89 वर्षी बनला बाप; पत्नी आहे वयानं लहान

Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय

Corona Virus मुळे रखडली 11 क्रिकेटपटूंची लग्न; कधी पूर्ण होणार बोहल्यावर चढण्याचं स्वप्न?

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइंग्लंड