Corona Virus : गौतम गंभीरची दिल्ली सरकारला आणखी 50 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांवर टीका

दिल्ली सरकारनं त्यानं केलेली मदत नाकारल्याचा आरोप गंभीरनं केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 12:41 PM2020-04-06T12:41:31+5:302020-04-06T12:42:17+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus : Gautam Gambhir offers Rs 50 lakh more from MPLAD fund to Delhi govt for procurement of equipment for medical staff svg | Corona Virus : गौतम गंभीरची दिल्ली सरकारला आणखी 50 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांवर टीका

Corona Virus : गौतम गंभीरची दिल्ली सरकारला आणखी 50 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांवर टीका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरनं दिल्ली सरकारच्या मदतीसाठी आणखी 50 लाखांची मदत केली आहे. नवी दिल्लीतील विलगीकरण कक्ष आणि कोरोनासंदर्भात सरकारी वैद्यकीय यंत्रणांना मोठी गरज भासत आहे.  यापूर्वी गंभीरनं आपल्या खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास 50 लाख  रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे, दिल्लीतील सरकारी रुग्णालयात कोरोनासंदर्भात रुग्णांसाठी, किंवा संशयित रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध केल्या जाऊ शकतात. पण, दिल्ली सरकारनं त्यानं केलेली मदत नाकारल्याचा आरोप गंभीरनं केला आणि आता अतिरिक्त 50 लाखांची म्हणजे एकूण 1 कोटी रुपये खासदार निधीतून देण्याचं जाहीर केलं. 

गौतम गंभीरनं यापूर्वी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी एक कोटींची मदत केली होती आणि दोन वर्षांचा पगारही दान करण्याचा निर्णय घेतला होता. दोन आठवड्यापूर्वी गंभीरनं दिल्ली सरकारला 50 लाखांची मदत जाहीर केली होती. त्यात आज अतिरिक्त 50 लाखांची भर घातली आहे. 


गंभीरनं म्हटलं की,''दिल्लीचे मुख्यमंत्री अरवींद केजरीवाल हे निधीची गरज असल्याचे सांगत आहेत. मी यापूर्वी त्यांना खासदार निधीतून 50 लाखांची मदत देऊ केली होती, परंतु इगोमुळे त्यांनी ते घेतले नाही. त्यामुळे मी आणखी 50 लाख मदत करण्याचे जाहीर करतो. जेणेकरून सामन्यांचे हाल होऊ नये. 1 कोटीच्या मदतीनं मास्क घेता येतील आणि PPE किट्सही लवकर घेता येतील.'' 



याआधी, कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.

अन्य महत्त्वाचा बातम्या

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!

आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान

हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन

Video : अजिंक्य रहाणेकडून तुळजापूरच्या शेतकऱ्याचं कौतुक, तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ 

 

Web Title: Corona Virus : Gautam Gambhir offers Rs 50 lakh more from MPLAD fund to Delhi govt for procurement of equipment for medical staff svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.