कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानातही काही भागांत लॉकडाऊन केले गेले आहे. या निर्णयामुळे गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी आफ्रिदी आणि त्याची फाऊंडेशन कार्य करत आहेत. त्याच्या या समाजकार्याचे भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने कौतुक केले होते. पण, त्याच्यावर टीका झाली. शेजारील राष्ट्रातील मदतीचे कौतुक काय करतोस, देशवासीयांना मदत कर, असा सल्ला अनेकांनी भज्जीला दिला. भज्जीनंही या टीकाकारांना सुनावलं.
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. गौतम गंभीरनं त्याच्या खासदार निधीतून 1 कोटींची मदत आणि दोन वर्षांचा पगार दान केला. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत.
हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी कोरोना व्हायरसच्या भीषण परिस्थितीत गरिबांना रेशन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्यानं 5000 कुटुंबीयांना रेशन पुरवण्याचा निर्धार केला आहे.
अन्य महत्त्वाचा बातम्या
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला क्रीडापटूंची साथ; सचिनपासून ते मेरी कोमपर्यंत सारे झाले सहभागी!
आफ्रिदीच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या युवराज सिंगचं लाखोंचं दान