कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशात गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुढे आला आहे. त्याच्या या समाजकार्याला भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. भज्जी अ्न युवीच्या या प्रतिक्रियेनंतर ट्विटर युजर्संनने त्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. ट्विटरवर सध्या #ShameonYuviBhajji हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. त्यावर युवीनं उत्तर दिलं.
भज्जी आणि युवी यांनी शाहिद आफ्रिदी करत असलेल्या समाजकार्यात हातभार लावण्याचं आवाहनही लोकांना केलं आहे. त्यामुळेच, नेटीझन्स युवी अन् भज्जीवर संतापले आहेत. कोरोना व्हायरससाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी आपापल्या परीनं या समाजकार्यात हातभार लावताना दिसत आहेत. शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशननं आतापर्यंत पाकिस्तानातील दोनशेहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम केलं आहे. त्याच्या या समाजकार्याचं भज्जी आणि युवी यांनी कौतुक केलं आहे.
युवीनं ट्विट केलं की,''हा कसोटीचा काळ आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही अशा लोकांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग योगदान करूया.... मी शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या फाऊंडेशनच्या समाजकार्याला सपोर्ट करतो. तुम्हीही त्याच्या समाजकार्यात मदत करा, असं आवाहनही करतो.''
त्यानंतर युवी व हरभजनवर सोशल मीडियावर टीका केली. त्यावर युवीला मी भारतीय आहे, असं म्हणण्याची वेळ आली. त्यानं ट्विट केलं की,''माझ्या एका मॅसेजवर एवढा हल्लाबोल करण्यासारखं काय होतं, हे मला समजलं नाही. तरीही कोणालाही दुखवायचा माझा हेतू नव्हता. मी भारतीय आहे आणि नेहमी मानवतेसाठी उभा राहीन. जय हिंद.''
अऩ्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत
तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स
मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत
सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय...
रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी
भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर
जगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय? 'Nude' होत करतेय जिम!
Web Title: Corona Virus : I am an Indian and will always stand for humanity, Yuvraj Singh reply to trollers svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.