Corona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व जग एकजुटीनं काम करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 02:58 PM2020-04-01T14:58:05+5:302020-04-01T15:54:05+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus : Indian Cricketer Sheldon Jackson help needy people svg | Corona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर

Corona Virus : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व जग एकजुटीनं काम करत आहे. क्रीडापटूही आपापल्या परीनं सरकराला मदत करत आहेत.ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी ते सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वच खेळाडू पुढे आले आहेत. त्यात आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज शेल्डन जॅक्सन गरजूंना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे.

सौराष्ट्र संघाचा प्रतिनिधित्व करणारा शेल्डन 2009 आणि 2010च्या आयपीएल मोसमास कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्यांनंतर 2012-13च्या स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या शेल्डनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आपल्या ताफ्यात घेतले. त्यानं भारतीय निवड समितीवर टीका केली होती. भारतीय निवड समिती सौराष्ट्रच्या खेळाडूंसोबत दुजाभाव करते, असा आरोप त्यानं केला होता. लॉकडाऊनमध्ये शेल्डन गरजूंना फळांचं वाटप करत आहे.

यापूर्वी त्यानं भटक्या प्राण्यांनाही मदत केली होती. 


दरम्यान, इंग्लंडचा यष्टिरक्षक जोस बटलर त्याच्या जर्सीचा लिलाव करणार आहे. लॉर्ड्सवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला सुपर ओव्हरमध्येही विजय मिळवता आला नाही. सर्वाधिक चौकाराच्या नियमानं इंग्लंडला विजेता जाहीर केले. या ऐतिहासिक क्षणाची जार्सी आता बटलर लिलावात ठेवणार आहे. त्यानं लिहिलं की,''रॉयल ब्रॉम्प्टन आणि हॅरफिल्ड हॉस्पिटलच्या चॅरिटीसाठी वर्ल्ड कप अंतिम सामन्याच्या अंतिम सामन्यातील जर्सी लिलावात ठेवणार आहे. गत आठवड्यात या हॉस्पिटल्सनी मदतीचं आवाहन केलं होतं.''

बटलरनं पुढं म्हटलं की,''तुम्ही सर्व सुरक्षित असाल आणि घरीच असाल अशी अपेक्षा करतो. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, नर्स जीवाचं रान करून कर्तव्य बजावत आहेत. आता त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. मी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील जर्सीचा लिलाव करण्याचे ठरवले आहे. या लिलावातून उभा राहणारा निधी हॉस्पिटन्सना दिला जाईल.''

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

 तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स 

मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत

 सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय... 

रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी

Web Title: Corona Virus : Indian Cricketer Sheldon Jackson help needy people svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.