Join us  

Corona Virus Lockdown : राजस्थानवरून पायी येणारा मजूर मोहम्मद शमीच्या घराजवळ चक्कर येऊन पडला अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 1:16 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्यावर गेली आहे. त्यापैकी 1 लाख 26,776 लोकांना प्राण गमवावे लागले, तर 4 लाख 84,781 जणं बरे झाले आहेत. भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 11,555 इतका झाला आहे. त्यापैकी 396 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1362 जणं बरे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जागोजागी अडकून पडलेल्या स्थलांतरीत कामरागांची चिंता वाढली आहे. काही कामगारांनी पायीच आपल्या घरचा रस्ता धरला होता. त्यापैकी एक कामगार राजस्थानवरून निघाला आणि भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या घराजवळ चक्कर येऊन पडला. 

शमीनं हा प्रसंग सांगितला. तो म्हणाला,''तो राजस्थानातून आला होता. त्याला बिहारमध्ये जायचे आहे आणि लखनौपासून ते बऱ्याच अंतरावर आहे. प्रवास करण्यासाठी सुविधा नाही. तो भूकेमुळे माझ्या घरापाशी चक्कर येऊन पडला, हे मी माझ्या CCTV कॅमेरात पाहिले. मी त्याला जेवण दिले आणि माझ्यापरीनं मदत केली.''

''मी माझ्यापरीनं जेवढी मदत करू शकतो तेवढी करतोय. असे अनेक स्थलांतरीत कामगार आहेत, ज्यांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. माझ्या घराजवळच हायवे आहे आणि त्यामुळे मी असे कामगार रोज पाहतो. त्यांना शक्य तितकी मी मदत करतो,'' असे शमीनं सांगितलं. ''मी जेवण बनवायला शिकतोय. स्वयंपाकघरात मी आईला मदत करतोय,'' असे शमीनं सांगितलं.   

अन्य महत्त्वाच्या बातम्या

वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण; Hardik Pandya, Harbhajan Singh यांनी व्यक्त केली चिंता 

Shoaib Akhtar सुधरणार नाही; भारत-पाकिस्तान मालिकेवरून पुन्हा बरळला!

BCCI बेभरवशी, पाकिस्तान क्रिकेटला भारताची गरज नाही; PCB अध्यक्षांची टीका

Video : Corona Virus ला हरवून मानवतेचा वर्ल्ड कप जिंकूया; Ravi Shastriचं आवाहन

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामोहम्मद शामी