कोरोना व्हायरसमुळे जगात भीतीचं वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. त्यात परदेशातून येणाऱ्या विमान सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा माजी गोलंदाज इयान ओब्रायन हॅमिल्टन येथे अडकल्याची वृत्त समोर आले होते. त्याची पत्नी आणि मुलं ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. आता इंग्लंडच्या गोलंदाजावर आपल्या पत्नीपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजताय महत्त्वाचा वाटा उचलणाऱा गोलंदाज लायम प्लंकेटची पत्नी अमेरिकेत अडकली आहे.
प्लंकेट सध्या इंग्लंडमध्ये आपल्या घरात एकटाच राहत आहे. कोरोना व्हायरसमुळे त्याची पत्नी एमिली अमेरिकेत अडकली आहे. एमिली काही कामासाठी अमेरिकेत गेली होती, परंतु तेथे तेव्हा कोरोना व्हायरस पसरलं नव्हतं. पण, आता तेथील अवस्था गंभीर झाली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख 15,215 वर पोहोचली आहे आणि मृतांची संख्या पाच हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत एमिली अमेरिकेत अडकली आहे आणि ती आता इंग्लंडमध्ये परतू शकत नाही.
प्लंकेटनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखलीत ही माहीती दिली. तो म्हणाला,''एमिलीसोबत मी तिथे असतो तर बरं झालं असतं. जेव्हा तुमच्याकडून काही हिस्कावलं जातं, तर त्याचं दुःख अधिक होतं. आम्ही एकमेकांना बरेच दिवस पाहिलेलं नाही आणि आता एकमेकांची भेट कधी होईल हेही माहीत नाही. हा दुरावा सहा महिन्यांचाही असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्तही.''
2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत प्लंकेटनं अंतिम सामन्यात 42 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या होता. फलंदाजीत त्याला केवळ 10 धावा करता आल्या होत्या.
Corona Virusच्या संकटात न्यूझीलंडच्या फलंदाजाचा मोठा निर्णय; केली निवृत्तीची घोषणा
Video : एक वर्ष झालं नाही अन् मला चॅलेंज? रोहित शर्मानं घेतली रिषभ पंतची फिरकी