कोरोना व्हायरसच्या वाढच्या भीतीमुळे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( PCB ) पाकिस्तान सुपर लीगचे प्ले ऑफचे सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेला इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स याच्यात कोरोना विषाणूची लक्षणं आढळल्यानं ही लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा रंगली. PCBनेही या वृत्ताला दुजोरा देताना पाकिस्तान सुपर लीमधील खेळाडू, साहाय्यक कर्मचारी, सामनाधिकारी, ब्रॉडकास्टर्स आणि संघ मालकांची कोरोना चाचणी करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार १२८ जणांची कोरोना चाचणी झाली आणि त्याचा अहवाल PCBने गुरुवारी जाहीर केला.
मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगचे उपांत्य व अंतिम फेरीचे सामनेही पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. सहा संघाचा समावेश असलेली ही लीग २० फेब्रुवारीपासून सुरू झाली. प्रथमच ही लीग पूर्णपणे पाकिस्तानात खेळवण्यात आली आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळवला. ३० सामन्यानंतर चार संघाचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला. पेशावर झाल्मी, मुल्तान सुल्तान, लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला. पण, उपांत्य सामन्यापूर्वी ही लीग पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर १२८ जणांची कोरोना चाचणी झाली आणि ते सर्व नेगेटिव्ह असल्याचे समोर आल्याची माहिती PCBने दिली. PCBचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खान यांनी सांगितले की,''पाकिस्तान सुपर लीग आणि PCB यांच्या प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न होता. ही स्पर्धा संपेपर्यंत पाकिस्तानमध्येच थांबण्याचा निर्णय घेणाऱ्या खेळाडू, साहाय्यक कर्मचारी, ब्रॉडकास्टर आणि सामनाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली आणि त्यांचा अहवाल नेगेटिव्ह आला. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी PCB सर्व काळजी घेत आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 रद्द झाल्यास MS Dhoniसह तीन खेळाडूंना मोठा फटका!
टीम इंडियाच्या ओपनरला ओळखलंत का? ऑस्ट्रेलियात पदार्पण करताना मोडलेला ७१वर्षांपूर्वीचा विक्रम
... तर Virat Kohli, MS Dhoni यांच्यासह अनेकांना कोट्यवधींचा भुर्दंड
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा IPL 2020 मधील सहभाग अनिश्चित, सरकारचा मोठा निर्णय