कोरोना विषाणूंमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारनं मुंबईत होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री करू नका, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सला प्रेक्षकांविनाच वानखेडे स्टेडियमवर आपले सामने खेळावे लागणार आहे. आता रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजनेही असाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची फटकेबाजी क्रिकेटचाहत्यांना प्रत्यक्ष पाहता येणार नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचे सामन्यांना प्रेक्षकांना No Entry चा बोर्ड लावण्यात येणार आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजीच्या उर्वरित लढती नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. पण, प्रेक्षकांना प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन त्याचा आस्वाद घेता येणार नाही. आयोजकांनी गुरुवारी तसे निवेदन जाहीर केले आहे. त्याशिवाय या स्पर्धेचा दुसरा टप्पा १४ ते २० मार्चला पुण्यात होणार होता. पण, आता ते सर्व सामने डी वाय पाटील स्टेडियमवर होतील. २२ मार्चला स्पर्धेचा अंतिम सामनाही येथेच होईल.
निवेदनात म्हटले आहे की,''लोकांच्या आणि खेळाडू व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचे उर्वरित सामने स्टेडियमच्या बंद दरवाजात खेळवण्यात येणार आहेत. व्यवस्थापक आणि भागदारक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यानुसार पुढील अपडेट दिले जातील. प्रेक्षकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल आम्ही दिलगिर आहोत. ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना येत्या ७-१० दिवसांत पैसे परत मिळतील.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक
Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका