Join us  

Corona Virus: Sachin तुस्सी ग्रेट हो; 5000 लोकांच्या एका महिन्याचा रेशन खर्च उचलला

Corona Virus शी मुकाबला करण्यासाठी तेंडुलकरनं यापूर्वी 50 लाखांची मदत केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 4:24 PM

Open in App

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत. त्यात क्रिकेटपटूही कुठेच मागे नाही. रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, गौतम गंभीर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, सुनील गावस्कर यांनी आपापल्या परीनं केंद्र व राज्य सरकारच्या सहाय्यता निधीत मदत केली आहे. इरफान व युसूफ पठाण बंधूंनी 4000 माक्सचं वाटप तर केलंच, शिवाय गरजूंसाठी 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाट्यांचं वाटप केलं आहे. अशा या समाजकार्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरही मैदानावर उतरला आहे. त्यानं अपनालय या स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमाला मदत केली आहे.

तेंडुलकरनं पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे. आता तेंडुलकरनं अपनालय या संस्थेला मदत करताना 5000 लोकांच्या एका महिन्याच्या रेशन खर्च उचलला आहे. लॉकडाऊनच्या काळात रोजंदारी कामगार करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या हाताला कामच नसल्यानं त्यांच्या रोजच्या जेवणाची आबाळ झाली आहे. अशांच्या मदतीसाठी तेंडुलकरनं पुढाकार घेतला आहे.

अपनालय संस्थेनं त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट लिहीली की,''लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या सचिन तेंडुलकरचे आभार. तेंडुलकर 5000 लोकांच्या महिन्याच्या रेशनचा खर्च उचलणार आहे.''  तेंडुलकरनंही त्यांना शुभेच्छा दिल्या.  अपनालय फाऊंडेशन 1973 पासून काम करत आहे. मुंबईतील पाच झोपडपट्टी भागात ही संस्था काम करत आहे.  यापूर्वीची तेंडुलकरनं या संस्थेला मदत केली आहे.  

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Good News : IPL 2020 होणार; BCCI नं तयार केला 'मास्टर प्लान'!

Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?

Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला

अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Cute Video

धवनने लॉकडाऊनचा नियम मोडला; पोलिसांनी पावती फाडली

गरजूंना धान्यवाटप करताना शाहिद आफ्रिदीकडून 'गंभीर' चूक, पाहा व्हिडीओ

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरससचिन तेंडुलकर