कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर्स आणि पोलीस आघाडीवर जाऊन लढत आहेत. मात्र त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेसच्या मुरादाबाद जिल्ह्यातील नागफनी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर्सवर नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झाले. भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणनं या व्यक्तिंचा चांगलाच समाचार घेतला.
पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ
क्रिकेटपटू पठाण बंधूंची समाजसेवा; कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करतायत मदत
त्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला, परंतु तो ज्या लोकांच्या संपर्कात होता, त्यांच्या तपासणी साठी डॉक्टर्सचे पथक येथे गेले होते. डॉक्टरांचं एक पथक रुग्णाच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यासाठी घेऊन जात होतं. मात्र परिसरातल्या लोकांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. त्यात एका डॉक्टरसह 3 पोलीस जखमी झालेत. यात काही गाड्यांचही मोठं नुकसान झालं.
केरळ राज्याचं कौतुक...इरफाननं यावेळी केरळ राज्याचे कौतुक केले. तो म्हणाला,''कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी केरळ राज्य चांगलं काम करत आहे. गेल्या 24 तासांत केवळ एकच कोरोना रुग्ण तेथे सापडला आहे. ते योग्य पाऊल टाकत आहेत.. त्यांनी देशात सर्वाधिक चाचण्याही केल्या आहेत.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
स्टीव्ह स्मिथ शोकमग्न; सोशल मीडियावरून दिली दुःखद बातमी
Andrew Flintoffचा अजब दावा; म्हणे पृथ्वी गोलाकार नाही, तर...
EXPENSIVE: हार्दिक पांड्याच्या शर्टची किंमत ऐकून येईल चक्कर; इतक्या रुपयात येतील 30-40 ब्रांडेड शर्ट
पाकिस्तानला पडतंय ICCच्या स्पर्धा आयोजनाचं स्वप्न; दावा सांगण्याची तयारी
'या' Hot खेळाडूसोबत टीम इंडियाच्या फलंदाजाला जायचंय डिनरला!
धक्कादायक; Corona Virus मुळे कर्ट अँगलसह अनेक WWE स्टार्स करारमुक्त
कोरोना व्हायरसमुळे स्टार खेळाडूच्या आईचे निधन; महिनाभर सुरू होता संघर्ष