संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी झगडत आहे. जगभरात आतापर्यंत २ लाख ४५, ७४९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील मृतांचा आकडा १० हजाराच्या वर गेला आहे, पण बरे झालेल्यांची संख्या ८८, ४४१ इतकी आहे. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 195 पर्यंत पोहोचली आहे. कोरोना व्हायरसमुळे क्रीडा आणि बॉलिवूड क्षेत्रालाही फटका बसला आहे. त्यामुळे अनेक खेळाडू आणि बॉलिवूड सेलिब्रेटी घरातच राहणे पसंत करत आहेत. त्यामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हा सेलिब्रेटी जोडीचाही समावेश आहे. या दोघांनी शुक्रवारी सोशल मीडियावरून फॅन्सना महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका रद्द करण्यात आली. धरमशाला येथे झालेला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पण, तेव्हा भारतातील कोरोना ग्रस्तांची संख्या ही शंभरच्या वर गेली होती. त्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिका रद्द करावी लागली. त्यानंतर आफ्रिकेचा संघ मायदेशी परतला, तर टीम इंडियाचे सदस्य आपापल्या घरी परतले आहेत. बॉलिवूड कलाकारही सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. शुक्रवारी विराट आणि अनुष्का यांनी एकत्रित एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.
''आपण सर्व एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी घरी थांबण्याची गरज आहे. आम्ही दोघंही स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षिततेसाठी घरीच थांबत आहोत. एकांतवासात जाऊन सुरक्षित राहू....,'' असा संदेश या दोघांनी दिला आहे.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Corona Virus : ...अन् इंग्लंडचा खेळाडू बनला अन्नदाता; शाळकरी मुलांना पुरवतोय जेवण!
पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद
Corona Virusशी मुकाबला करण्यासाठी शेन वॉर्नचा मोठा निर्णय; तुम्हीही कराल कौतुक
Web Title: Corona Virus : Stay Home, Stay Safe, Stay Healthy; Appeal Virat kohli and Anushka Sharma together svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.