मेलबोर्न : झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू असताना एक धक्कादायक माहिती उघड झाली. गेल्या आठवड्यात महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात खेळविण्यात आला. या सामन्याला उपस्थित असलेल्या ८६ हजार प्रेक्षकांमध्ये एकजण कोरोनाग्रस्त होता. त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता खळबळ माजली आहे.
महिला टी-२० विश्वचषकातील अंतिम सामना मेलबोर्न येथे झाला. विक्रमी प्रेक्षक लाभलेल्या गर्दीत एक कारोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मेलबोर्न क्रिकेट मैदान व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी याविषयी माहिती दिली. ८ मार्च रोजी झालेल्या महिला टी-२० विश्वचषकाचा सामना पाहायला आलेला कोरोना संशयित होता. त्याची तपासणी करण्यात आली असून, सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच उपचार सुरू आहेत.
८६ हजार लोकांमध्ये हा रुग्ण वावरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करीत पाचव्यांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविला. कोरोनाग्रस्त व्यक्ती एमसीजीच्या सेक्शन ए ४२ नॉर्दर्न स्टॅन्डच्या लेव्हल २ येथील आसनावर बसली होती. या व्यक्तीच्या जवळपास बसलेल्या अन्य लोकांनी मात्र आपापला दिनक्रम सुरू ठेवावा, स्वच्छतेवर भर द्यावा, खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा, अशा आशयाच्या सूचना एमसीजी व्यवस्थापन समिती आणि स्थानिक आरोग्य विभागाने सामना पाहणाºया प्रेक्षकांना दिल्या आहेत.
Web Title: Corona Virus: At the T20 Women's World Cup final, there was a coronet in the 5,000 spectators, then ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.