कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी पुढे आले आहेत. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सुरेश रैना, सौरभ गांगुली, गौतम गंभीर यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपापल्या परीनं मदत केली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री व त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मिळून पंतप्रधान व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत केली. पण, या कपलनं नक्की किती मदत केली हे जाहीर केले नाही. त्यावरूही या दोघांचे कौतुक झाले. आता विराट पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी पुढे आला आहे. त्यानं सोशल मीडियावर लोकांना एक आवाहन केलं आणि त्याचं कौतुक होत आहे.
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत. सुनील गावस्कर यांनी 59 लाखांची मदत केली.
विराटनं शनिवारी एक पोस्ट लिहीली... त्यात त्यानं म्हटलं की,''I For India हे कॉन्सर्ट फेसबुकवर लाईव्ह होणार आहे. विवारी सायंकाळी 7.30 वाजता होणारे हे लाईव्ह कॉन्सर्ट Give India या संस्थेकडून आयोजित केले गेले आहे आणि या कॉन्सर्टमधून उभा राहणारा सर्व निधी कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी दान केला जाणार आहे.'' विराटनं या चळवळीला पाठींबा दिला असून त्यानं इतरांनाही दान करण्याचं आवाहन केलं आहे.
Shoaib Akhtar अन् पीसीबी यांच्यातील वाद आणखी चिघळणार; माजी गोलंदाजाचा पलटवार
Herschelle Gibbs करणार 'त्या' ऐतिहासिक खेळीच्या बॅटचा लिलाव
न्यूझीलंडची महिला खेळाडू लै डेंजर; रोहित, सचिनसह कुणालाच नाही जमला हा पराक्रम
विराट कोहलीनं फिल्मी स्टाईलनं दिल्या पत्नी अनुष्का शर्माला शुभेच्छा
टीम इंडियानं 42 महिन्यांनी गमावलं अव्वल स्थान; सर्वाधिक काळ टॉपवर राहणारा सातवा संघ!