नवी दिल्ली : संयुक्त अरब अमीरातमध्ये (यूएई) आयपीएलचे सामने तीन ठिकाणी होणार आहेत. त्यातील अबु धाबीमध्ये कोविडबाबत एकदम कडक निर्णय घेण्यात येत आहेत. त्यामुळे बीसीसीआयला अबु धाबीकडून असहकार्य मिळत आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयने आता यावर उपाय म्हणून युएईच्या सरकारकडे नियमांत शिथिलता आणण्यासाठी बातचीत सुरु केली आहे.कोविड-१९ च्या समस्येमुळे बीसीसीआयने आतापर्यंत लीगच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. त्यांनी यासंदर्भात आठ फ्रेन्चायझींनाही काही सांगितलेले नाही. युएईएतील एका फ्रेन्चायझींच्या सूत्राने सांगितले की, बीसीआयने आतापर्यंत आयपीएल कार्यक्रमाबाबत काहीही सांगितले नाही. जर आयपीएल स्पर्धा होणार नसती तर आम्हाला यापूर्वीच कळविल्या गेले असते. फ्रेन्चायझींनी संघांवर खूप पैसा खर्च केला आहे. पॉझिटिव्ह रुग्णही वाढत आहेत. मुद्दा हा नाही की बीसीसीआयला जर आयपीएल रद्द करायची असेल तर त्यांनी ती आजच करावी. ते १५ दिवसांनंतर करु शकत नाहीत. फ्रेन्चायझी सध्या युएईत आहेत. त्यांनी आपल्या संघांवर खूप पैसा खर्च केला आहे. खेळाडूंनाही पैसा द्यावा लागेल.स्पर्धा रद्द झाल्यानंतर खेळाडूंना आम्ही असे सांगू शकत नाही की, आम्ही तुम्हाला पैसे देउ शकत नाही, याकडेही बीसीसीआयने लक्ष द्यायला हवे. सध्या बीसीसीआयचे अधिकारी दुबई, शारजाह आणि अबुधाबी येथे सरकारसोबत बातचीत करीत आहेत.आयपीएल गर्व्हनिंग काउंसिलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल आणि मंडळाचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमीन सध्या युएईत ओहत. ते अमीरातच्या तीन सरकारांसोबत चर्चा करीत आहेत. कोविड-१९ नियमांत शिथिलता मिळाली तर दुसऱ्याप्रकारचे नियोजन करता येईल, असा त्यांचा प्रयत्न आहे. जर एखादा दुबईतून अबधाबी येथे जाणार असेल तर त्याला सीमेवरच कोविड-१९ ची तपासणी करावी लागेल. यासाठी दीड तासांचा वेळ लागतो. त्यानंतर ४८ तासांच्या आत निगेटिव्ह सर्टिफिकेट दाखवावे लागेल. त्यामुळे कोहली, धोनीसारख्या खेळाडूंना तुम्ही रांगेत उभे ठेवू शकत नाही त्यामुळे या खेळाडूंची हॉटेलमध्येच चाचणी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा बीसीसीआयने सरकारकडे केली आहे. कोरानाच्या शिरकावामुळे हेजलवुड चिंतीतसाऊथम्पटन : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) संघात कोविड-१९चा शिरकाव झाल्यामुळे आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने चिंता व्यक्त केली आहे. हेजलवुड म्हणाला,‘आम्ही एका व्हॉट््सएप गु्रपच्या माध्यमातून जुळलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला माहिती मिळते. हा खरेच चिंतेचा विषय आहे.’ जे पॉझिटिव्ह आढळले ते वेगळ्या हॉटेलमध्ये विलगीकरणात आहेत. बीसीसीआयच्या एसओपीनुसार जे पॉझिटिव्ह आढळले त्यांना १४ दिवस अनिवार्य विलगीकरणात रहावे लागणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- coronavirus: बीसीसीआयची दुबई सरकारसोबत बातचीत , कोविडबाबत सरकारी नियम शिथिल करण्याची विनंती
coronavirus: बीसीसीआयची दुबई सरकारसोबत बातचीत , कोविडबाबत सरकारी नियम शिथिल करण्याची विनंती
कोविड-१९ च्या समस्येमुळे बीसीसीआयने आतापर्यंत लीगच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. त्यांनी यासंदर्भात आठ फ्रेन्चायझींनाही काही सांगितलेले नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 3:04 AM