Join us  

coronavirus: स्टाफ सदस्य  कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने कॅबचे कार्यालय सात दिवस बंद

सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील अस्थायी कर्मचारी शनिवारी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला चारनोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तो आठवडाभरापासून कॅबच्या कार्यालयात आला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:44 AM

Open in App

कोलकाता : ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावरील एका अस्थायी कर्मचाऱ्याला कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे बंगाल क्रिकेट संघटनेने (कॅब) रविवारपासून मुख्यालय सात दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.कॅबचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी सांगितले की,‘सिव्हिल इंजिनियरिंग विभागातील अस्थायी कर्मचारी शनिवारी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला चारनोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, तो आठवडाभरापासून कॅबच्या कार्यालयात आला नव्हता. वैद्यकीय समितीमध्ये समावेश असलेल्या प्रतिष्ठित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आम्ही पुढील सातदिवसासाठी कॅबचे कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत सर्व सुरक्षा नियमांचा विचार करता सॅनिटायझेशन करण्यात येईल.’ अविषेक पुढे म्हणाले, ‘कॅबचे कार्यालय अधिकृतपणे उघडण्यात आले नव्हते आणि किमान कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम सुरू होते.’राज्यात शनिवारी कोविड-१९ चे विक्रमी ७४३ रुग्ण आढळून आले तर एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूही शनिवारी झाले.ही संख्या १९ होती. कोलकातामध्ये शनिवारी विक्रमी २४२ रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८६४ झाली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापश्चिम बंगाल