कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आयपीएलच्या 13 व्या मोसमाची सर्वांना उत्सुकता आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे टीम इंडियातील पुनरागमन आयपीएलच्या कामगिरीवर अवलंबून आहे. शिवाय लीगपूर्वीच सनरायझर्स हैदराबादनं कर्णधारपदाची माळ पुन्हा डेव्हिड वॉर्नरच्या गळ्यात घातल्यानं 2016 चा करिष्मा पुन्हा होईल का, याचीही आतुरता आहे. पण, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. त्यात ऑस्ट्रेलियन सरकारने नागरिकांना परदेश दौऱ्यावर जाऊ नका, असे आवाहन केल्यानं आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सनरायझर्स हैदराबादच्या नवनियुक्त कर्णधार वॉर्नरने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या या स्फोटक फलंदाजानं कौटुंबिक आणि वैयक्तिक कारणास्तव 100 लीगमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील वन डे मालिकामध्ये आणि 100 लीग यांच्या तारखा क्लॅश होत असल्यानं वॉर्नरने या लीग खेळण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे ही मालिका 2023च्या वन डे वर्ल्ड कप च्या पात्रता स्पर्धेतील आहे. ऑस्ट्रेलिया जून महिन्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेचे यजमानपद भूषविणार होते, परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सुधारित वेळापत्रक जाहीर केले आणि ही मालिका आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला होईल. 100 लीग ही 17 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे वॉर्नरने माघार घेतली आहे.
पण, कोरोना व्हायरसमुळे 100 लीगवरही अनिश्चिततेचं सावट येऊ शकते. या लीगमध्ये वॉर्नर हा साऊदॅम्पटन येथील साऊदर्न ब्रेव्ह संघाचे प्रतिनिधित्व करणार होता. त्याला या संघानं 125000 पाऊंडमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. आता त्याची रिप्लेसमेंट म्हणून मार्कस स्टॉयनिसची निवड करण्यात आली आहे. अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्क हे ऑसी खेळाडूही 100 लीगमध्ये खेळणार आहेत.
मग वॉर्नर आयपीएल खेळणार का?
29 मार्चला सुरू होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यात ऑस्ट्रेलियन सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे खेळाडूंच्या सहभागाविषयी संभ्रम आहे. पण, वॉर्नरचा मॅनेजर जेम्स एर्स्किन याने आयपीएल झाल्यास वॉर्नर नक्की खेळेल, अशी माहिती दिली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
'मोदीजी आपकी लिडरशीप काफी विस्फोटक है!', इंग्लंडच्या क्रिकेटपटूचं ट्विट अन्...
टोकियो ऑलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल, थॉमस बाक
coronavirus : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व झाले ठप्प
OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह
Web Title: Coronavirus: David Warner Pulls Out of The Hundred svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.