Join us  

Coronavirus: प्रवासात अडकला किवी गोलंदाज; आजारी पत्नीच्या चिंतेनं झाला हवालदिल

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांनी घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. पण, या निर्णयामुळे अनेकजण आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 5:29 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील वाहतुक व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. अनेक देशांनी परदेशातून येणाऱ्या विमानसेवा रद्द केल्या आहेत.  या निर्णयामुळे  न्यूझीलंड संघाचा माजी गोलंदाज इयान ओ'ब्रायन विमानतळावर अडकून बसला आहे. न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचे कुटुंब लंडनमध्ये स्थायिक आहेत आणि त्याची पत्नी आजारी आहे व फुफ्फुसच्या आजारानं झगडत आहे. त्यामुळे तिला कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याचे, इयान याला वाटते. त्यामुळे त्याची चिंता अधिक वाढली आहे.

क्रिकेटपटू पठाण बंधूंची समाजसेवा; कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी करतायत मदत

वेलिंग्टनमधील 43 वर्षीय इयान पत्नी आणि दोन मुलांसह लंडन येथे स्थायिक झाला आहे. तो काही कामानिमित्त न्यूझीलंडमध्ये दाखल आला होता.''मला माझ्या पत्नीची चिंता आहे. तिला फुफ्फुसाचा त्रास आहे आणि तिला त्वरित संसर्ग होऊ शकतो,'' असे इयानने सांगितले. त्यानं 22 कसोटी, 10 वनडे आणि चार ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो पुढे म्हणाला,'' हा व्हायरस तिचा जीव घेईल. तिच्यासोबत माझी मुलही आहेत आणि तिची 80 वर्षांची आईही सोबत आहे. त्यामुळे माझी चिंता अधिक वाढली आहे.'' 

जगभरात आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी अडकले आहेत. घरी परतण्यासाठी इयानने बरेच पैसे खर्च केले, परंतु त्याला अपयश आले आहे. वेलिंग्टन ते लंडन येथील विमानसेवा मंगळवारी रद्द करण्यात आली.  

''तीन विमानांची तिकीट मला मिळाली, हे माझं नशीब. पण, त्यापैकी ती सर्व विमानं रद्द करण्यात आली,'' असे त्याने सांगितले. इयानच्या नावावर 73 कसोटी विकेट्स आहेत. 2008मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यानं 75 धावांत 6 विकेट्स घेत सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. तो म्हणाला,''हा क्षण मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा आहे, परंतु मी तक्रार करू शकत नाही. अनेक लोकं अशी आहेत, की ज्यांची अवस्था माझ्यापेक्षाही वाईट आहे. माझी पत्नी हेच माझ्या चिंतेचं कारण आहे. मला घरी परत जायचे आहे. त्यानंतर दोन आठवडे सेल्फ आयसोलेशनमध्ये जाऊन नंतर तिला मदत करायची आहे.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार

IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

Video : जगातला अव्वल अष्टपैलू क्रिकेटर आयसोलेशनमध्ये; मुलीला पाहता येत नसल्यानं झाला भावुक

चिनी लोकांवर भडकला इंग्लंडचा क्रिकेटपटू; हासडली F#@#@G सणसणीत शिवी

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यान्यूझीलंड