कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस ठरले आहे. त्यामुळे श्रीमंत माणूसच नव्हे तर सामान्य जनतेलाही झळ सहन करावी लागत आहे. जगभरात अनेक व्यवसाय बंद झाले आहेत आणि त्यामुळे अनेकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड पडली आहे. ही परिस्थिती कधी सुधरेल याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. पण, या परिस्थितीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बराच कालावधी जाईल हे नक्की. व्यावसाय बंद झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पण, इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. त्यांनी त्यांच्या पबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवली आहे आणि तेही स्वतःला नुकसान सहन करून...
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लंडनमधील सर्व पब व बार बंद करण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पण, इंग्लंडचे क्रिकेटपटू हॅरी गर्नी आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी अशा कर्मचाऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी त्यांचे पब बंद करून त्याचे रुपांतर किराणा मालाच्या विक्रीचं दुकानात केले आहे. जेणेकरून पबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोजगार सुरू राहील.
''आमच्या पंतप्रधानांनी पब बंद करण्याचे आदेश दिला. पण, त्यापूर्वीच आम्ही आमच्या पबचे किराणा मालाच्या दुकानात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या संकल्पनेतून आम्ही आमच्या पबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोजगार कायम राखू शकतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येणार नाही,''अशी माहिती गर्नी याने दिली. गर्नी आणि ब्रॉड यांची भागीदारी असलेला पब आहे. पुढील सहा महिन्यांसाठी हा बदल असेल. परिस्थिती सुधारल्यास पुन्हा पब ओपन करण्यात येईल. असेही त्याने सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...
Coronavirus : आता आयसीसीचेही ‘वर्क फ्रॉम होम’, अनेक कर्मचारी घरुनच करणार काम