लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाचा २५ जूनपासून सुरू होणारा इंग्लंड दौरा ईसीबीने एक जुलैपर्यंत अस्थायी स्वरूपात स्थगित केला आहे. कोरोनामुळे इंग्लंडमध्ये किमान एक जुलैपर्यंत सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट निलंबित ठेवण्याचा ईसीबीने निर्णय घेतला.भारताला दोन आठवड्यांच्या या संक्षिप्त दौऱ्यात चार एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन टी-२० सामने खेळायचे होते. ९ जुलै रोजी दौºयाची सांगता होणार होती. लाल चेंडू तसेच पांढºया चेंडूने खेळल्या जाणाऱ्या सामन्यांचे संशोधित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून त्यामुळे काऊंटी सत्रातील नऊ फेऱ्यांचे सामनेदेखील स्थगित करण्यात आले आहेत.ईसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले, ‘कोरोनाच्या संकटामुळे व्यावसायिक क्रिकेटला महत्त्व देण्याऐवजी खेळाडू, कर्मचारी आणि क्रिकेट चाहत्यांचा जीव मोलाचा आहे. या उन्हाळ्यात थोडेफार क्रिकेट खेळायला मिळाले तरी समाधान असेल. शासनाच्या निर्देशानुसार सध्या कुठलेही क्रिकेट होणार नाही, असे म्हणणे योग्य ठरेल.’ इंग्लंडच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय सत्र जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. त्यात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका आणि भारताविरुद्ध महिला संघाच्या मालिकांचा समावेश असला तरी दोन्ही मालिकांच्या तारखांमध्ये बदल होईल. या संदर्भात बोर्डाच्या बुधवारी होणाºया बैठकीत पुढील निर्णय होणार आहे. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- CoronaVirus: भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा स्थगित
CoronaVirus: भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरा स्थगित
कोरोनामुळे इंग्लंडमध्ये किमान एक जुलैपर्यंत सर्व प्रकारचे व्यावसायिक क्रिकेट निलंबित ठेवण्याचा ईसीबीने निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 2:36 AM