मुंबई - चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे संकट आता भारतात येऊन घडकले आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाचा फटका भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही बसण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या झपाट्याने होत असलेल्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयपीएलच्या आयोजकांना महत्त्वपूर्ण सूचना केल्याचे वृत्त आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आयपीएलबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यावेळी राज्य सरकारने आयपीएलच्या आयोजनाबाबत सावध भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएलचे सामने आयोजित करण्यास सरकारने मनाई केलेली नाही. मात्र हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होऊ नये म्हणून सामन्यांची तिकीट विक्री न करण्याचा सल्ला राज्य सरकारने आयोजनांना दिल्याचे कळते. त्यामुळे यावर्षी क्रिकेटप्रेमींना स्टेडियम बाहेरूनच सामन्यांचा आनंद घ्यावा लागणार आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव संसर्गाने होत असल्याचे खबरदारी म्हणून गर्दी करणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आयपीएलच्या सामन्यांनाही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक येत असतात. त्यामुळे संपर्क होऊन कोरोना विषाणू फैलावण्याची भीती आहे. त्यामुळे सामन्यांची तिकीट विक्री न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र आयपीएलवर मोठ्या प्रमाावर अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची सूचना करण्यात आलेली नाही. आता स्टेडियममध्ये येऊन सामने पाहता आले नाहीत तरी क्रिकेटप्रेमींना टीव्हीवरून आयपीलएलचा आस्वाद घेता येणार आहे.
संबंधित बातम्या
India vs South Africa, 1st ODI : Corona Virusची टीम इंडियाच्या खेळाडूंना धास्ती; महत्त्वपूर्ण निर्णय